शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवक व प्रशासकाने समन्वय ठेवून कार्यवाही करावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक ...

तळोदा : तालुक्यातील बहुसंख्य ग्रामपंचायतीवर प्रशासकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यामुळे गावातील जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडविण्यासाठी ग्रामसेवक व प्रशासकाने आपसात समन्वय ठेवून त्यावर कार्यवाही करावी, अशी सूचना आमदार राजेश पाडवी यांनी दिली.

तळोदा येथील सांस्कृतिक भवनात शुक्रवारी ग्रामीण भागातील पाणीटंचाई व विकास कामांचा आढावा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी आमदार राजेश पाडवी होते. व्यासपीठावर तहसीलदार गिरीश वखारे, सभापती यशवंत ठाकरे, गटविकास अधिकारी रोहिदास सोनवणे, ग्रामीण पाणी पुरवठ्याचे कार्यकारी अभियंता व्ही.डी. दरेवार, पंचायत समिती सदस्य विजय राणा, दाज्या पावरा, वनक्षेत्रपाल नीलेश रोढे, सहाय्यक प्रकल्पाधिकारी अमोल मेटकर, सानुबाई वळवी उपस्थित होते. प्रारंभी त्यांनी ग्रामीण भागातील पाणीटंचाई, घरकुले, वनपट्टे, या प्रश्नांची गावनिहाय आढावा तेथील सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडून घेतला. अनेक ठिकाणी पाण्याची समस्या सोडविण्यासाठी नवीन हातपंप जीर्ण जलवाहिन्या, कूपनलिका यांची मागणी सरपंचांनी केली आहे. त्याचबरोबर अनेक पाड्यांमध्ये पाणी प्रश्न आजही असून, त्यांना झऱ्याच्या पाण्यावर अवलंबून रहावे लागत असल्याचे सांगण्यात आले. काही गावांमध्ये स्मशानभूमीचा प्रश्न असून, त्यासाठी निधीची मागणी करण्यात आली आहे. अनेक ठिकाणी जीर्ण तारा, पोल, नवीन पोल नसल्यामुळे विजेची समस्या असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. तब्बल तीन ते चार तास ही आढावा बैठक सुरू होती. आढावा घेतल्यानंतर आमदार पाडवी यांनी उपस्थित पदाधिकारी व कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, ज्या ठिकाणी पाण्याचा प्रश्न आहे तेथे शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत सुविधा देण्यात येतील. शिवाय जेथे वीज, रस्ते हे प्रश्न आहेत तेथे माझ्या डोंगरी विकास निधीतून कामे घेण्यात येतील. परंतु यासाठी ग्रामसेवकांनी तसा प्रस्ताव तातडीने पाठवावा; जेणे करून त्यावर लगेच कार्यवाही करता येईल, असे सांगून तळोदा तालुक्यात जवळपास ९० टक्के ग्रामपंचायतींची मुदत संपल्याने प्रशासक नियुक्त झाले आहे. त्यामुळे या प्रशासकांनी गावाचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी ग्रामसेवकांशी समन्वय ठेवून गावकऱ्यांशी संवाद साधावा. तसेही प्रशासकांना शासनाने धोरणात्मक निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहे. त्यामुळे त्यांनी प्रत्यक्ष गावात जाऊन प्रश्न सोडवावे. अनेक गावातील गावकऱ्यांच्या तक्रारी येतात. त्यामुळे कर्मचाऱ्यांनीही आपली जबाबदारी ओळखून त्या सोडवण्याच्या प्रयत्न करावा. जेथील तक्रारी येतील तेथील कर्मचाऱ्यावरही कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.

सूत्रसंचालन ग्रामसेवक मधुकर कापुरे यांनी केले. ही बैठक यशस्वी करण्यासाठी महसूल कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. बैठकीत ग्रामीण भागातील सरपंच, ग्रामसेवक, तलाठी उपस्थित होते.