शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपाल दौऱ्यासाठी मोलगी झाले चकाचक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क मोलगी : आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात २० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भेट ...

लोकमत न्यूज नेटवर्कमोलगी : आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात २० रोजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे भेट देणार आहेत़ दुर्गम भागातील मोलगी आणि भगदरी ता़ अक्कलकुवा येथे राज्यपाल विविध उपक्रमांना भेट देणार असल्याने दोन्ही गावे चकाचक करण्याचे काम सुरु आहे़राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारी सकाळी हेलिकॉप्टरने मोलगी येथे येणार आहेत़ युनिसेफच्या सहाय्याने मोलगी येथे तयार करण्यात आलेल्या पोषण पुनवर्सन केंद्राचे २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते उद्घाटन झाले होते़ याठिकाणी किमान १५ बालकांवर दर दिवशी उपचार करुन कुपोषणमुक्त करण्याची योजना अमंलात आणली गेली होती़ हा प्रयोग यशस्वी झाल्याने केंद्राचे विस्तारीकरण करण्यात आले आहे़ या विस्तारीकरणामुळे येथे २५ ते ३० बालकांवर आता उपचार शक्य आहेत़ या विस्तारीकरणाचे उद्घाटन राज्यपाल कोश्यारी यांच्याहस्ते करण्यात येणार आहे़ यासाठी पोषण पुनवर्सन केंद्राची इमारत सजवण्यात आली आहे़या उपक्रमासोबत राज्यपाल कोश्यारी हे दुर्गम भागातील मुख्य आहार असलेल्या भगर प्रकल्पाची पाहणी करणार आहेत़ मोलगी येथील या प्रकल्पाचीही साफ सफाई सुरु असून पूर्वतयारी जोरात सुरु असल्याचे चित्र याठिकाणी दिसून आले़ या भेटीनंतर भगदरी येथे राज्यपाल रवाना होणार असून येथील महूफळी अंगणवाडी केंद्रात ते भेट देऊन पाहणी करणार आहेत़ याच ठिकाणी कुक्कुटपालन व शेळी पालन उपक्रमाला भेटी देऊन ते माहिती घेणार आहेत़भगदरी येथील पेरु व आंबा लागवड बागांना भेटी देत पाहणी करणार आहेत़ यादरम्यान ते जलयुक्त शिवार व लोकसहभागातून तयार करण्यात आलेल्या बंधाऱ्यांची पाहणी करणार आहेत़ याठिकाणी माती नाला बांध, सिमेंट बंधारे आणि इतर शेतीपयोगी कामांची पाहणी करुन शेतकºयांसोबत संवाद साधणार आहेत़या दौºयात पशुसंवर्धन केंद्राच्या नव्या इमारतीचे उद्घाटनही राज्यपाल करणार असल्याने इमारत पूर्णपणे चकाचक झाल्याचे दिसून येत आहे़ भगदरी येथील शासकीय आश्रमशाळेला भेट दिल्यानंतर विद्यार्थी त्यांच्यासमोर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करणार असल्याने आश्रमशाळेतही जोरदार सराव सुरु असल्याचे चित्र आहे़ मोलगी येथील विश्रामगृहात त्यांचा मुक्काम राहणार असल्याने विश्रामगृह स्वच्छतेवर बांधकाम विभागाच्या अधिकाºयांकडून भर देण्यात येत होता़ दोन दिवसांपासून येथे संबधित विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तळ ठोकून आहेत़