चोरट्यांनी गोरगरीबांची घरे केली लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:51 IST2019-12-20T11:51:08+5:302019-12-20T11:51:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागात एकाच रात्रीतून आठ ते दहा ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न तसेच चोरीचा ...

Goals are destined for the poor | चोरट्यांनी गोरगरीबांची घरे केली लक्ष्य

चोरट्यांनी गोरगरीबांची घरे केली लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : तालुक्याच्या पूर्व भागात एकाच रात्रीतून आठ ते दहा ठिकाणी घरे फोडण्याचा प्रयत्न तसेच चोरीचा प्रकार झाला आहे़ यात चोरट्यांनी थेट गोरगरीबांना लक्ष करुन घरातील कपडे, धान्य आणि पैसे चोरुन नेल्याचे प्रकार समोर आल्याने कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
तालुक्यातील रनाळे येथे मंगळवारी पहाटे एक ते पाच यादरम्यान चोरट्यांनी निलेश चिमणराव आव्हाड यांच्या घरातून १५ हजार रुपये रोख व ४ हजार रुपये किमतीच्या साड्या चोरुन नेल्या तसेच गावातील भिलाटीत राहणाऱ्या रुख्माबाई ठेलारी यांच्या घरातून १० हजार ५०० रुपये किमतीचे तांब्या पितळीचे भांडे व १० हजार रुपयांची बाजरी चोरुन नेली़ निलेश आव्हाड व रुख्माबाई ठेलारी यांच्या घरांना कुलूप असल्याने चोरट्यांनी संधी साधून कुलूप तोडून आत प्रवेश ही चोरी केली होती़
याबाबत निलेश आव्हाड यांच्या फिर्यादीवरुन अज्ञात चोरट्यांविरोधात नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहायक पोलीस निरीक्षक पवार करत आहेत़ मंगळवारी पहाटे गावातील इतर ठिकाणी चोरीचे प्रयत्न झाल्याची माहिती देण्यात आली आहे़

Web Title: Goals are destined for the poor