शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

परतलेल्या स्थलांतरित मजुरांना गावालाच रोहयोची कामे द्या - जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 12:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : करोनामुळे मजुर वर्गाचा रोजगार गेला असून, अनेक मजूर हे जिल्ह्यात आपल्या मूळगावी परतल्याने त्यांच्यासमोर रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून कामे उपलब्ध करून देण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी शनिवारी झालेल्या आढावा बैठकीत दिले.
बैठकीस सहायक जिल्हाधिकारी अविशांत पांडा, तृप्ती धोडमिसे, रोहयोचे उपजिल्हाधिकारी सुधीर खांदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एन. पाटील, कृषी उपसंचालक एम.एस. रामोळे उपस्थित होते.
डॉ.भारूड म्हणाले की, मनरेगातून जिल्ह्यात पाच हजार १४४ कामे सुरू असून, ४१ हजार १५७ मजुरांना कामे उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या संख्येत अधिक वाढ करण्याचा प्रयत्न सर्व यंत्रणांनी करावा. जिल्ह्यातुन ७५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट असून, त्यादृष्टीने प्रलंबित असलेली कामे त्वरीत सुरू करण्यात यावीत. सध्या शेतीमजुरीची कामे कमी असल्यामुळे मनरेगा अंतर्गत कृषी विभागाने प्रत्येक तालुकास पाच हजार या प्रमाणे ३० हजार मजुरांना कामे उपलब्ध करून द्यावीत.
एका कृषी सहायकास पाच कामे, कृषी पर्यवेक्षक १०, कृषी अधिकाऱ्याने किमान १५ कामे करावीत, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळ्यात मनरेगाची इतर कामे होत नसल्याने फळबाग लागवडीची १०० टक्के कामे केल्यास फळबागाच्या कामातून ३० ते ३५ हजार मजुरांना रोजगार उपलब्ध करून देणे शक्य होईल. त्यादृष्टीने नियोजन करण्यात यावे. कोरोनाचा प्रसार होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी.
मनरेगाच्या कामाच्या ठिकाणी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पेपर सोप उपलब्ध करून देण्यात यावे. मजुरांना स्थानिक आरोग्य केंद्रांकडून आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि लक्षणे आढळल्यास लगेचच वैद्यकीय सुविधा उपलब्ध करुन द्यावीत.
काम करतांना पुरेसे अंतर ठेवून काम पूर्ण होईल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित अधिकाºयांना दिल्या. जिल्ह्यात बोगस बी-बियाणे तसेच जादा दराने खताची विक्री होत असल्यास संबधित दुकानावर तातडीने कारवाई करावी, असे निर्देशही दिले. मनरेगा अंतर्गत कामाची मागणी करण्याचे आवाहन करीत केंद्र सरकारच्या निर्देशानुसार प्रत्येक मजुराला किमान २३८ रूपये मजूरी दिवसाला मिळते. तर कामाच्या स्वरूपानुसार या मजुरीमध्ये वाढदेखील होते. मस्टर संपल्यानंतर आठ दिवसाच्या आत १०० टक्के मजुरांच्या खात्यावर मजुरीची रक्कम थेट जमा करण्यात येते. त्यामुळे ग्रामीण भागातील जास्तीत जास्त मजुरांनी कामाची मागणी करावी असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. याबैठकीस कृषी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.