शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
2
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
5
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
6
Raja Shivaji: सलमान खान ते विद्या बालन! रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये बॉलिवूड कलाकारांची तगडी फौज
7
Health Care Tips: का वाढतो उन्हाळ्यात हार्ट अटॅकचा धोका? जाणून घ्या कारणं आणि बचावाचे उपाय!
8
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
9
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
10
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
11
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
12
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
13
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
14
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
15
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
16
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
17
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
18
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
19
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
20
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
Daily Top 2Weekly Top 5

मुलीची छेड काढून पित्यास मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2019 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुलीची छेड काढणा:यांना जाब विचारणा:या पित्यावर एकाने धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मुलीची छेड काढणा:यांना जाब विचारणा:या पित्यावर एकाने धारदार शस्त्राने वार करुन जखमी केल्याची घटना जीटीपी महाविद्यालय परिसरातील भिलाटीत घडली़ मंगळवारी रात्री उशिरा घडलेल्या या प्रकारानंतर  दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला़ यातील एक संशयित अल्पवयीन आह़े जीटीपी महाविद्यालय भिलाटी परिसरात रात्री 11  वाजेच्या सुमारास चहाच्या टपरीवर 13 वर्षीय बालिका चहा वाटप करत असताना किशन कन्हैय्या भिल रा़माळीवाडा व त्याच्यासह एक अल्पवयीन असे दोघे आले होत़े दरम्यान किशन भिल याने चहा वाटणा:या 13 वर्षीय मुलीचा हात धरुन विनयभंग केला़ ही बाब मुलीच्या वडीलांना दिसून आल्यानंतर त्यांनी किशन भिल यास जाब विचारला होता़ याचा राग आल्याने त्याने पिडित मुलीच्या वडीलांना मारहाण करत जवळ असलेल्या कैचीने शरीरावर वार केला़ यात बरगडीला गंभीर दुखापत झाली़ दरम्यान सोबत असलेल्या अल्पवयीन संशयिताने त्याच्याजवळील  फायटरने पिडित मुलीच्या वडीलांच्या पाठीवर मारहाण करुन जखमी केल़े खोडाई माता यात्रोत्सवात रात्री उशिरार्पयत गर्दी असल्याने घटनेनंतर घबराट पसरली होती़ पिडित मुलीच्या वडीलांनी बुधवारी पहाटे शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरुन किशन भिल व सोबत असलेल्या अल्पवयीन मुलाविरोधात लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 सह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आह़े 

गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने हल्ला करणारा संशयित आरोपी किशन भिल याला अटक केली आह़े