शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
2
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
3
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
4
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
5
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
6
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
7
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
8
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
9
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
10
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
11
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
12
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
13
खासदार राघव चड्ढा यांची 'झेड प्लस' सुरक्षा हटवली
14
तुर्कस्थानातील शाळेत विद्यार्थ्याचा गोळीबार; ९ जण ठार
15
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
16
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
17
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
18
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
19
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
20
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
Daily Top 2Weekly Top 5

तूप बाजार मंडळ जपतेय सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 12:19 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरातील श्री तूप बाजार गणेश मित्र मंडळाचे यंदाचे 44 वे वर्ष आह़े सोमवारी सायंकाळी ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरातील श्री तूप बाजार गणेश मित्र मंडळाचे यंदाचे 44 वे वर्ष आह़े सोमवारी सायंकाळी येथे गणेश मूतीर्ची स्थापना मोठय़ा उत्साहात करण्यात आली़ गत 44 वर्षापासून जातीय सलोखा टिकवून ठेवत युवकांना प्रोत्साहन देणारे मंडळ म्हणून परिचित आह़ेशहाद्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या तूप बाजारात डॉ़ रतिलाल फकीरा पाटील, रामदास हरी पाटील, सुभाष सोमजी बडोदेकर, सुभाष बुधाजी धोबी, फकीरा धोबी, तुकाराम रामा कुंभार, रमेश छगन पटेल, सुभाष चतुर बागुल, राजाराम बन्सी धोबी, लोटन धोबी यांच्यासह परिसरातील सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येत या मंडळाची स्थापना केली होती़  शहराती एकमेव गणेश मंडळ असल्याने अल्पवधीतच ते नावरुपाला आले होत़े गत 44 वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रम राबवण्यात येत आहेत़ शीश महल, पंचगंगा, अष्टविनायक, व्यसनमुक्ती हे देखावे शहरातील नागरिकांच्या आजही स्मरणात आहेत़  हे देखावे पाहण्याकरीता शहरासह तालुक्याच्या कानाकोप:यातून नागरिक शहाद्यात भेट देत होत़े मंडळाने सातत्याने साध्यासरळ पद्धतीने उत्सव साजरा करत युवकांना मार्गदर्शन केले होत़े यातून शहरातील असंख्य किरकोळ विक्रेत्यांना जोडून घेतले होत़े  मंडळाकडून साध्या पद्धतीने अत्यंत साधेपणाने विसजर्न मिरवणूका करण्यात येतात़ गुलाल, ढोल-ताशे व वाजंत्रीवर होणारा खर्च वाचवत तो इतर कामांसाठी खर्च करण्यात येतो़  विसर्जन मिरवणुकीत हिंदू-मुस्लीम समाजबांधव एकत्रितपणे सहभागी होत असतात़ यंदा मंडळाचे अध्यक्ष म्हणून अशोक बुधाजी धोबी तर उपाध्यक्ष पदी  चंद्रकांत रामदास पाटील यांची निवड करण्यात आली होती़ त्यांच्या मार्गदर्शनात कार्यकर्ते येथे परिश्रम घेत आहेत़ यंदा सीसीटीव्ही लावून सुरक्षा व्यवस्था मजबूत केली आह़ेशिवराम गणेश मंडळ       शहरातील शिवरामनगर परिसरातील श्री शिवराम गणेश मंडळार्फे यंदा साधेपणाने गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प करीत  कोल्हापूर व सांगली येथील पूरग्रस्तांना 51 हजार रुपयांची सहाय्यता करण्यात आली़ मदतनिधी प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना देण्यात आला़  श्री शिवराम गणेश मंडळातर्फे दरवर्षी दरवर्षी भजन-कीर्तन, रांगोळी स्पर्धा, सजावट स्पर्धा, प्रबोधनपर व्याख्यान कार्यक्रम घेण्यात येतात़ यंदा  ह्या  सर्व उपक्रमांना फाटा देत 51 हजार रुपयांची मदत पूरग्रस्तांना देण्यात आली़ मंडळाने मूर्तीवरही अधिक खर्च न करता शाडू मातीची छोटी मूर्ती घेत उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला़ मंडळाचे सदस्य जिल्हा सरकारी वकील अॅड़ सुशील पंडीत, धनसिंग गिरासे, धनसिंग गिरासे, लोटनसिंग गिरासे, डी. एस.मोरे, नरेंद्र बागले, रामलाल तावडे, नामदेव शिंपी, भरत शिंपी, डॉ. नरेंद्र गिरासे ,सुनील तावडे, प्रल्हाद पटले, प्रकाश पाटील, राकेश मोरे, प्रेमसिंग गिरासे, नरेंद्र शिंपी, सुभाष पाटील, घनश्याम गिरासे, चेतन शिंपी, दिनेश तावडे उपस्थित होत़े 

तूप बाजार मित्र मंडळ  आणि डॉ़ आऱएफ़पाटील पतसंस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सामाजिक बांधिलकी जपत पुरग्रस्तांच्या मदतीसाठी 21 हजार रुपयांची मदत करण्यात आली आह़े मदतीचा धनादेश प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर यांना सोपवण्यात आला़ यावेळी माजी नगराध्यक्ष तथा पतसंस्थेचे चेअरमन रामदास हरी पाटील, मंडळाचे अध्यक्ष अशोक बुधाजी जाधव, चंद्रकांत पाटील, किशोर पाटील, सुनील पाटील राकेश बोरसे, मोहित धोबी, स्वप्नील लोहार, शुभम पाटील, हितेश बोरसे आदी उपस्थित होत़े 

शहादा शहरातील प्रकाशा रोड, गांधी पुतळा, मेनरोड व मोहिदा रोड भागात सकाळपासून गणेशमूर्ती खरेदीसाठी भाविक आणि मंडळांचे कार्यकर्ते आले होत़े शहरासोबतच तालुक्यातील आणि खेतिया परिसरातील विविध मंडळांची वाहने आल्याने गर्दी झाली होती़