शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Accident: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
Top Marathi News LIVE Updates: 'मीसिंग लिंक'चं आज उद्घाटन; मुंबई-पुणे प्रवास वेगवान, बोगद्याची नोंद गीनिज बुकात
3
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
4
"माझ्या डोळ्यांदेखतच माझी पत्नी आणि नातू..." जबलपूर दुर्घटनेतून वाचलेल्या पर्यटकाचा टाहो!
5
Vodafone Idea ला संजीवनी, सरकारचा २३ हजार कोटींचा दिलासा; का देण्यात आली ही सूट?
6
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
7
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
8
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
9
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
10
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
11
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
12
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
13
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
14
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
15
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
16
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
17
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
18
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
19
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
20
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटनेतील सहा जणांची टोळी अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2020 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कापूस व वाहनाची चाके चोरणाऱ्या टोळीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी प्रकाशा येथील कंपनीतून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कापूस व वाहनाची चाके चोरणाऱ्या टोळीला एलसीबीच्या पथकाने ताब्यात घेतले. त्यांनी प्रकाशा येथील कंपनीतून सव्वा लाखाच्या साहित्याचीही चोरी केल्याची कबुली दिली आहे.आझाद विठ्ठल ठाकरे, शाम सरदार ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, भुºया ऊर्फ भरुण महारु पाडवी, सुनिल विठ्ठल ठाकरे सर्व रा. डामरखेडा व अरुण देविसिंग खर्डे रा. कन्साई ता. शहादा अशी ताब्यात घेण्यात आलेल्या संशयीतांची नावे आहेत.प्रकाशा येथील सुरेश विठ्ठल ढोले याचे शेतातील बैलांच्या गोठ्याचे कुलप तोडुन ५० हजार रुपये किमतीचा १० क्विंटल कापुस चोरुन नेल्याची घटना घडली होती. तसेच डामरखेडा येथील जगन्नाथ हुला पाटील यांच्या ट्रॅक्टरचे दोन टायर व दोन ट्यूब घराचे कुलुप तोडून चोरी झाले होते. याबाबत शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दोन्ही गुन्ह्यांची गुन्हा करण्याची पध्द्त व दोन्ही गुन्ह्यातील कालावधी तसेच गुन्हा करण्याची वेळ या बाबींचा स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी बारकाईने अभ्यास केला.चोरी करणारे स्थानिक किंवा आजुबाजुच्या परीसरातीलच असावे त्याअनुषंगाने तपासासाठी त्यांची पाच कर्मचाऱ्यांचे पथक तयार करुन शहादा तालुक्यातील प्रकाशा व आजूबाजुच्या गावात तपासासाठी पाठविले. या दरम्यान प्रकाशा येथे संशयीत आला असल्याची माहिती मिळाली.गावातील बस स्थानक परीसरातील एका चहाच्या टपरीवर संशयीत दिसताच त्याला झडप घालून ताब्यात घेतले. त्याने सुनिल विठ्ठल ठाकरे रा. डामरखेडा असे नाव सांगितले. डामरखेडा येथील टायर चोरीची आणि अडीच महिन्यापूर्वी प्रकाशा येथील कृष्णा कॉटन फायबर जिनिंग फॅक्टरीमधून सव्वा लाखाची वीज मोटर व इतर साहित्य चोरल्याची कबुली दिली. त्याच्या इतर साथीदारांचीही माहिती त्याने दिली. पथकाने आझाद विठ्ठल ठाकरे, शाम सरदार ठाकरे, मंगल शंकर ठाकरे, भुºया ऊर्फ भरुण महारु पाडवी, सुनिल विठ्ठल ठाकरे सर्व रा. डामरखेडा व अरुण देविसिंग खर्डे रा. कन्साई ता. शहादा यांना ताब्यात घेवुन १८ हजार रुपये किमतीचे दोने टायर व कापुस विकण्यासाठी वापरण्यात आलेले २ लाख १० हजार रुपये किमतीचे वाहन असा एकुण २ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करुन आरोपी व मुद्देमाल शहादा पोलीसांच्या ताब्यात देण्यात आलेला आहे.ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस उपनिरीक्षक योगेश राऊत, हवालदार प्रदीपसिंग राजपुत, विकास कापुरे, अविनाश चव्हाण, पुरुषोत्तम सोनार, शोएब शेख यांच्या पथकाने केली.परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून चोरीचे सत्र सुरू होते. विशेषत: शेत शिवारातून आणि निर्जन ठिकाणाहून वस्तू चोरीच्या घटना वाढल्या होत्या. पोलिसांनी चोरट्यांच्या टोळीला ताब्यात घेतल्याने आता त्यांच्याकडून आणखी काही घटना उघडकीस येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलिसांनी तपासाला गती दिली आहे.