जुगार अड्ड्यावर धाड: पाच जण ताब्यात; सव्वा लाखही जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:26 IST2021-01-09T04:26:25+5:302021-01-09T04:26:25+5:30

म्हसावद पोलीस सूत्रानुसार असे की, खेडदिगर बसस्थानक परिसरात वनविभाग कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीत दुस-या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून ...

Gambling den raid: Five arrested; A quarter of a lakh was also seized | जुगार अड्ड्यावर धाड: पाच जण ताब्यात; सव्वा लाखही जप्त

जुगार अड्ड्यावर धाड: पाच जण ताब्यात; सव्वा लाखही जप्त

म्हसावद पोलीस सूत्रानुसार असे की, खेडदिगर बसस्थानक परिसरात वनविभाग कार्यालयाजवळ असलेल्या इमारतीत दुस-या मजल्यावर जुगार अड्डा सुरू असल्याच्या माहितीवरून स्थानिक गुन्हा शाखा अन्वेषण नंदुरबार यांच्या पथकाने धाड टाकली. धाड टाकली असता एक जण पळून गेला तर पाच आरोपींना पकडण्यात यश आले. यात राजू गंगाराम चौधरी याच्याकडून ४५,४५० रुपये, रवींद्र बुधा वाघ ३७,८२० रुपये व २० हजार रुपयांचा मोबाइल, राजू पंडित पवार याच्याकडून १ हजार रुपये व २ हजारांचा मोबाइल. प्रवीण भिका जाधव साडेचार हजार रुपये व १ हजाराचा मोबाइल सर्व राहणार खेतिया (म.प्र.). सचिन राधेशाम परदेशी साडेनऊ हजार रुपये रा. कोळदा ता. नंदुरबार यांच्यासह जमिनीवर पडलेली रक्कम १० हजार ८३० रुपये असा एकूण १ लाख ३२ हजार शंभर रुपये आरोपींसह जप्त करण्यात आले आहे. याबाबत पोलीस नाईक विकास अजगे यांनी फिर्याद दिल्यानुसार महाराष्ट्र जुगार कायद्याप्रमाणे म्हसावद पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. हवालदार अजित गावीत, गोमा वसावे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Gambling den raid: Five arrested; A quarter of a lakh was also seized