कोरोनाचा पराभव करुन चौघे परतले घरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 13:36 IST2020-05-06T13:36:19+5:302020-05-06T13:36:27+5:30

नंदुरबार : कोरोनाचा पराभव करुन नंदुरबारातील चौघे आज घरी परतले़ चौघा बाधितांना सिव्हीलच्या आयोसोलेशन वॉर्डातून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला ...

The four returned home after defeating Corona | कोरोनाचा पराभव करुन चौघे परतले घरी

कोरोनाचा पराभव करुन चौघे परतले घरी

नंदुरबार : कोरोनाचा पराभव करुन नंदुरबारातील चौघे आज घरी परतले़ चौघा बाधितांना सिव्हीलच्या आयोसोलेशन वॉर्डातून सन्मानपूर्वक निरोप देण्यात आला आहे़ यावेळी रुग्णालयाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़
४८ वर्षीय पुरुष, युवक, युवती आणि वृद्ध महिला अशा चौघांना निरोप देण्यात आला आहे़ बुधवारी या चौघांचे अहवाल निगेटिव्ह आल्याचा अहवाल जिल्हा रुग्णालयाला प्राप्त झाला होता़ त्यानुसार त्यांना डिस्चार्ज करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला होता़ सकाळी चौघांना कक्षातून बाहेर आणल्यानंतर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव व टाळ्या वाजवून स्वागत करण्यात आले़ जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ आऱडी़भोये, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ़ के़डी़सातपुते यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते़ चौघांनी जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या सेवेबद्दल कृतज्ञता व्यक्त करुन सर्वांनी घरी राहून कोरोनासोबत मुकाबला करावा असे बाहेर पडताना सांगितले़


‘सबके लिए दुवा करेंगे’


’ नंदुरबार शहरातील चौघे कक्षातून बाहेर आल्यावर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आनंद व्यक्त केला़ यावेळी वृद्ध महिलेने संपूर्ण जग कोरोनामुक्त व्हावे यासाठी देवाकडे प्रार्थना करणार असल्याचे सांगून सर्वांनी काळजी घ्यावी असे सांगितले़
’ चौघेही एकाच कुटूंबातील असल्याची माहिती असून त्यांना १८ एप्रिलपासून क्वारंटाईन कक्षात आणण्यात आले होते़ याठिकाणी तीनवेळा स्वॅब नमुने तपासणी करुन त्याच्या अहवालाची पडताळणी करुन सर्वांना घरी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला़
’ दरम्यान जिल्हाधिकारी यांच्यासह प्रशासनानेही आरोग्य विभागाचे कौतूक केले असून चौघे कोरोनामुक्त झाल्याने शहरात समाधान व्यक्त करण्यात येत आहे़

Web Title: The four returned home after defeating Corona