प्रकाशा येेथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार लाखा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 01:16 PM2020-10-23T13:16:14+5:302020-10-23T13:16:21+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : प्रकाशा ता. शहादा येथील संगमेश्वर रस्त्यावर गणपती मंदिराच्या मागे नदीकाठी काटेरी झुडूपात सुरु असलेल्या ...

Four lakh items were seized from a gambling den at Prakasha | प्रकाशा येेथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार लाखा मुद्देमाल जप्त

प्रकाशा येेथे जुगार अड्ड्यावर धाड टाकून चार लाखा मुद्देमाल जप्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : प्रकाशा ता. शहादा येथील संगमेश्वर रस्त्यावर गणपती मंदिराच्या मागे नदीकाठी काटेरी झुडूपात सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर बुधवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास शहादा पोलिसांनी धाड टाकली. या धाडीत ३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी १० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 प्रकाशा येथे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती शहादा पोलीसांना मिळाली होती. माहितीवरून पोलीसांनी या ठिकाणी छापा टाकत  किशोर उर्फ ठेंगा कमु पाडवी, अमिताभ येण्या भिल, सुरेश धोंडू भोई, दुर्या मंगल ठाकरे, देवसिंग रामचंद्र भिल, सजन सुरजमल जैन, राजू शिवाजी ठाकरे, रविंद्र तुंबा सावळे, दिनेश सुकराम ठाकरे, संजीव उद्धव नाईक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून १२ मोटारसायकली, १७ हजार ४०० रुपयांचे मोबाईल तसेच १५ हजार २२० रुपये रोख असा एकूण ४ लाख  २ हजार ६२० रुपयांचा ऐवज जप्त केला. याबाबत पोलीस नाईक मणिलाल दिलीप पाडवी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक एम. रमेश, पोलीस निरीक्षक किसन नजनपाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक कैलास माळी, पोलीस नाईक माणिलाल पाडवी,सुनील पाडवी, मुकेश राठोड, प्रताप गिरासे, योगेश माळी, पंकज जिरेमाळी, होमगार्ड तुषार पाटील यांनी केली.
शहादा तालुक्यात तीन महिन्यांपासून सलग जुगार अड्ड्यांवर धाडी सुरु असून दीड महिन्यातील ही तिसरी मोठी कारवाई असल्याची माहिती देण्यात आली आहे. 

Web Title: Four lakh items were seized from a gambling den at Prakasha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.