शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

जि.प.साठी चार तर पं.स. साठी तीन लाख खर्च मर्यादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2019 12:05 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची खर्च मर्यादा चार लाख तर गणासाठी तीन लाख रुपये ठेवण्यात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवाराची खर्च मर्यादा चार लाख तर गणासाठी तीन लाख रुपये ठेवण्यात आली आहे. अनामत रक्कम गटासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला हजार रुपये तर आरक्षीत प्रवर्गाला ५०० रुपये. गणासाठी सर्वसाधारण प्रवर्गाला ७०० तर आरक्षीत प्रवर्गाला ३५० रुपये अनामत रक्कम ठेवण्यात आली आहे.जिल्हा परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्यास बुधवार, १८ पासून सुरुवात झाली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीप्रमाणे आॅनलाईन अर्ज भरून त्याची प्रिंट निवडूणक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे आवश्यक आहे.याबाबत निवडणूक विभागाने उमेदवारांना उमेदवारी अर्ज सादर करतांना विविध मार्गदर्शक सुचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्हा परिषद व पंचायत समितीसाठी उमेदवाराचे वय किमान २१ वर्ष पुर्ण असावे. उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र आॅनलाईन सॉफ्टवेअर द्वारेच भरणे आवश्यक आहे. त्यासाठी ६६६.स्रंल्लूँं८ं३ी’ीू३्रङ्मल्ल.ेंँं१ं२ँ३१ं.ॅङ्म५.्रल्ल या वेबसाईटचा वापर करावा. एकजण गट किंवा गणातून जास्तीत जास्त चार अर्ज सादर करू शकतात. उमेदवारी अर्जावर एक सुचक आवश्यक असून जी व्यक्ती मतदार म्हणून अपात्र नसेल व ज्या निवडणूक विभागात, निर्वाचक गणात उमेदवारास नामनिर्देशन करावयाचे असेल अशा संबधित मतदार विभागाच्या निर्वाचक गणातील मतदार यादीत नाव समाविष्ट असणे आवश्यक आहे.उमेदवाराने मतदार यादीतील तपशील जसे गट, गण क्रमांक, यादी भाग क्रमांक, मतदार अनुक्रमांक काळजीपूर्वक भरावा. इतर गण, गटातील उमेदवारांनी मतदार यादीची छायांकित प्रत जोडावी. नामनिर्देशन पत्रावर आरक्षणाची वर्गवारी अचूक नमुद करावी. नामनिर्देशन पत्रातील सर्व रकान्यातील माहिती अचूक नमुद करावी, माहिती निरंक असल्यास तसे नमुद करावे. शपथ पत्रातील सर्व रकान्यातील माहिती भरावी. कोणताही रकाना कोरा राहता कामा नये. तीन चिन्हांचा पसंती क्रम देणे अनिवार्य आहे.नामनिर्देशन पत्रासोबत गुन्हेगारी पार्श्वभुमी व स्थावर/जंगम मालमत्तेबाबत शपथपत्र करावे. नोटरीकडून साक्षांकित करावे मात्र त्यासाठी बाँडपेपरची आवश्यकता नाही. आरक्षीत जागेवर निवडणुकीसाठी सक्षम अधिकारी यांचे जात प्रमाणपत्र वैधता प्रमाणपत्र अथवा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर केल्यास पुरावा जोडणे आवश्यक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेचे नादेय प्रमाणपत्र असावे. शौचालय वापराबाबतचे ग्रामसभेच्या ठरावासोबत पंचायतीची प्रमाणपत्र आवश्यक आहे. शेड्यूल बँकेमधील नवीन स्वतंत्र खात्याचे पासबूकची छायांकितप्रत जोडावे. निवडणूक ओळखपत्र, आधारकार्डची छायांकित प्रत जोडावी. मान्यताप्राप्त नोंदणी कृत राजकीय पक्षाचे उमेदवारांनी नमुना २ अ व नमुना २ ब जोडावा. अनामत रक्कम भरल्याबाबतची पावती जोडणे आवश्यक असल्याचेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.