शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा केंद्रात फिरणाऱ्या २३ जणांवर गुन्हे दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीच्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया तब्बल २३ जणांवर तळोदा पोलिसांनी मनाई ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बारावीच्या पहिल्या पेपरला बाहेरून कॉपी पुरविण्याच्या प्रयत्न करणाºया तब्बल २३ जणांवर तळोदा पोलिसांनी मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पोलीस अधीक्षकांनी संबधीत पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे सक्त आदेश दिले आहेत.दहावी व बारावीच्या परीक्षांच्या वेळी बाहेरून कॉपी पुरविणे, परीक्षा केंद्र परिसरात उपद्रव करणाºया व्यक्तींविरुद्ध थेट जमावबंदी व मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्याची अंमलबजावणी पहिल्या पेपरपासूनच सुरू झाली आहे. मंगळवारी पहिल्या पेपरला तळोदा येथील परीक्षा केंद्रावर कॉपी पुरविण्याचा प्रयत्न करणाºया, परीक्षा केंद्राच्या १०० मिटर आत प्रवेश करणाºयांवर तळोदा पोलिसांनी थेट कारवाई केली आहे. एकुण २३ जणांविरुद्ध जिल्हाधिकाºयांनी लागू केलेल्या जमावबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्वच फिर्यादी या पोलीस कर्मचाºयांनी दिल्या आहेत.नंदुरबार तालुक्यातील खोंडामळी येथे देखील परीक्षा केंद्र परिसरात विनापरवानगी उपस्थित असलेल्या जमावावर पोलिसांनी थेट कारवाई केली होती. यातून झालेल्या पळापळीमुळे दहा ते १२ दुचाकींचे देखील नुकसान झाल्याचा प्रकार घडला होता़दरम्यान, यापुढे देखील परीक्षेदरम्यान बाहेरून कॉपी पुरविणाºयांविरुद्ध पोलिसांकडून थेट गुन्हे दाखल करण्यात येतील. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना परीक्षा केंद्रात सोडल्यानंतर वेळेत परीक्षा केंद्रातून बाहेर पडावे. विनाकारण परीक्षा केंद्र परिसरात रेंगाळू नये असे आवाहन पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.