अफू प्रकरणी पाच संशयीतांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 21:40 IST2021-03-12T21:40:09+5:302021-03-12T21:40:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :   तालुक्यातील म्हसावद महसुली मंडळातील शिरुड तह शिवारातील साडेसात एकर अफूची शेतीत आढळलेल्या अफू ...

Five suspects in opium case remanded in police custody for five days | अफू प्रकरणी पाच संशयीतांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

अफू प्रकरणी पाच संशयीतांना पाच दिवसांची पोलीस कोठडी

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा :   तालुक्यातील म्हसावद महसुली मंडळातील शिरुड तह शिवारातील साडेसात एकर अफूची शेतीत आढळलेल्या अफू प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाच जणांना १५ मार्च पर्यंत पोलीस   कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान यातील मुख्य सूत्रधारापर्यंत अद्यापही पोलीस पोहचू शकले नसल्याचे चित्र आहे.    
तालुक्यातील शिरुड शिवार गट नंबर २८/१  मध्ये  अवलसिंग नवलसिंग भिल व रहेमसिंग जालमसिंग भील यांच्या मालकीच्या शेतातील अफु सदृश्य पिकाची लागवड करण्यात आली होती. 
सदर शेत जमीन शेतकऱ्यांनी मेंढपाळांना भाडे तत्वावर खेडण्यास दिल्याचे बोलले जात आहे. म्हणून याप्रकरणी  म्हसावद पोलिसांनी अवलसिंग नवलसिंग भिल , रा . शिरुड , ता . शहादा व रहेमसिंग जालमसिंग भिल , रा . शिरुड , ता. शहादा यासह काढा गेंदा ठेलारी, भगवान पुना   ठेलारी दोन्ही रा.आसाणे ता.जि.नंदुरबार. बंडु सुका ठेलारी रा.करले, ता.शिंदखेडा  या पाच जणांवर  म्हसावद पोलिस  ठाण्यातील उपनिरीक्षक सुनील रत्नाकर बिऱ्हाडे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयीत पाचही जणांना अटक करुन  त्यांचे कडुन  एकूण ९०५४ किलो सुुुुमारे ४५ लाख २७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. 
दरम्यान, या प्रकरणी मुख्य सूत्रधार कोण? याबाबत तर्कवितर्क कायम आहेत. पोलिसांनी त्या दृष्टीने देखील शोध सुरू करावा व त्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी मागणी करण्यात येत आहे. 

Web Title: Five suspects in opium case remanded in police custody for five days