मास्क न लावणाऱ्यास दिली पाच दिवस कैदची शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:49 IST2020-04-10T12:49:19+5:302020-04-10T12:49:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नवापूर येथील जहागीर उस्मान मिर्झा रा.नवापूर याला नवापूर ...

Five days imprisonment for not wearing a mask | मास्क न लावणाऱ्यास दिली पाच दिवस कैदची शिक्षा

मास्क न लावणाऱ्यास दिली पाच दिवस कैदची शिक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मास्क न लावता फिरतांना आढळून आल्याने नवापूर येथील जहागीर उस्मान मिर्झा रा.नवापूर याला नवापूर प्रथमवर्ग वर्ग न्यायालयाने पाच दिवसांची साध्या कैदेची शिक्षा सुनावली.
नवापुरातील लाईट बाजार भागात ९ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता जहांगीर उस्मान मिर्झा हा व्यक्ती मास्क न लावता फिरत होता. त्याला पोलिसांनी अडविले असता त्याने कोरोना हवेतून पसरत नाही म्हणून मास्क किंवा रुमाल तोंडाला बांधणार नाही असे सांगितले. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होईल अशा पद्धतीने वागला. त्यामुळे त्याच्याविरुद्ध नवापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याला नवापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी आर.बी.बहिरवाल यांच्या न्यायालयापुढे उभे केले. न्यायालयाने जहागीर मिर्झा याला पाच दिवस साधा कारावासची शिक्षा व हजार रुपये दंड ठोठावला. दंड न भरल्यास दोन दिवस सध्या कैदेची शिक्षा सुनावली. दोषारोपपत्र सहायक निरिक्षक धिरज महाजन यांनी सादर केले. पैरवी अधिकारी म्हणून हवालदार प्रमोद पाठक होते.
निकाल देतांना न्यायालयाने म्हटले आहे की, कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर होत असल्याने गंभीर परिस्थिती उद्भवली आहे. संसर्ग सार्वजनिक ठिकाणी टाळता यावा म्हणून नागरिकांनी तोंडावर मास्क किंवा रुमाल बांधण्याबाबत संबधीत यंत्रणांनी सुचना जाहीर करूनही नागरिकांनी बेजबाबदारपणाचे वर्तन टाळावे. सबळ कारणाशिवाय आरोपीने सदर स्वरूपाचे केलेले वर्तन हे कोरोना विषाणू संसर्ग कालावधीत गंभीर स्वरूपाचे असल्याने जास्तीत जास्त शिक्षेद्वारे दंडनीय ठरविणे हे कायदा व सुव्यवस्थेचे पालन व्हावे म्हणून आवश्यक ठरत असल्याचे म्हटले आहे.
जिल्ह्यात मास्क न लावणाऱ्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ असल्याने खळबळ उडाली आहे.

Web Title: Five days imprisonment for not wearing a mask