लोकमत न्यूज नेटवर्कधडगाव : धडगांव : तालुक्यातील छापरी येथील काल्या वळवी यांच्या घराला आग लागून धान्यासह जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.अचानक लागलेल्या या आगीत कुठलीही जीवीतहानी झाली नाही. मात्र घरासह धान्य, जीवनाश्यक वस्तू, कपडे असे जळून खाक झाले. शनिवारी दुपारपर्यंत घटनास्थळी कुणीही शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. आगीत या कुटुंबाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे कुटुंब उघड्यावर आले असून उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.संबंधित अधिकाऱ्यांनी पंचनामा करुन नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी काल्या वळवी व त्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}