शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

अखेर आंबेबारा धरण ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 13:32 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहराला 30 टक्के पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. यामुळे शहरवासीयांची पाण्याची चिंता काही प्रमाणात मिटली आहे. याशिवाय 70 टक्के पाणीपुरवठाची मदार असणा:या विरचक प्रकल्पात ज्या डॅमच्या सांडव्यामधून पाणी येते ते खोलघर धरण देखील ओसंडून वाहू लागले आहे. परिणामी विरचकमधील पाणीसाठा 14 टक्केपेक्षा अधीक झाला आहे.नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारे आंबेबारा धरण गेल्यावर्षी 80 टक्के तर विरचक प्रकल्प केवळ 29 टक्के भरला होता. त्यामुळे उन्हाळ्याच्या शेवटी आणि पावसाळा लांबल्याने जून महिन्यात शहरवासीयांना काही प्रमाणात पाणी टंचाईला सामोरे जावे लागले होते. यंदाच्या दुष्काळात राज्यात सर्वत्र टंचाई असतांना अनेक ठिकाणी दोन ते आठ दिवसात पाणी पुरवठा होत असतांना नंदुरबार पालिकेने नियोजन करून नियमित एक दिवसाआड एकवेळ पाणी पुरवठा सुरू ठेवला होता. यंदा जुलैच्या शेवटच्या आठवडय़ार्पयत पुरेसा पाऊस नव्हता. आंबेबारा धरण तर एप्रिल महिन्यातच कोरडे झाले होते. विरचकमध्येही केवळ डेड स्टॉक शिल्लक होता. परिणामी 1 ऑगस्टपासून नंदुरबारात दोन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याचे जाहीर करण्यात आले होते. सुदैवाने जुलैच्या शेवटच्या आठवडय़ात दमदार पाऊस झाला. विरचक आणि आंबेबारामध्ये पाणी येऊ लागल्याने हा निर्णय लागलीच रद्द करण्यात आला. आंबेबारा भरले..आंबेबारा धरण गेल्या वर्षी पुर्ण क्षमतेने भरले नव्हते. जवळपास 10 ते 12 वर्षानंतर अशी परिस्थिती होती. परिणामी हे धरण एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात कोरडे झाले. येथून होणारा पाणी पुरवठा देखील तेंव्हापासून बंद झाला होता. त्यामुळे विरचक प्रकल्पावर संपुर्ण 100 टक्के पाणी पुरवठय़ाचा ताण पडत होता. यामुळे वारंवार पाणी पुरवठय़ाचे वेळापत्रक विस्कळीत होत होते. आताच्या दमदार पावसामुळे आंबेबारा धरण ओव्हरफ्लो झाले आहे. या धरणातील पाणी शिवण नदीद्वारे विरचक प्रकल्पात येत आहे. लवकरच आष्टे पंपींग स्टेशनवरूनही पाणी पुरवठा सुरू केला जाणार आहे.खोलघर धरणही ओसंडले..शिवण नदीचा जलप्रवाह ज्या धरणावर अवलंबून आहे ते नवापूर तालुक्यातील खोलघर धरण देखील भरून वाहू लागले आहे. यामुळे आंबेबारा आणि खोलघर धरणातील ओसंडणा:या पाण्याचा प्रवाह शिवण नदीत येत असल्यामुळे विरचक प्रकल्पातील पाणीसाठा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. सद्य स्थितीत विरचक प्रकल्पात 14 टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे. आणखी 10 टक्के पाणीसाठा झाला तर संपुर्ण वर्षभराची पाण्याची चिंता मिटणार आहे.