शहरं
Join us  
Trending Stories
1
तारीख ठरली...! सर्वात मोठी अट इराणला मान्य? 'पीस टॉक-२' संदर्भात अमेरिकेची मोठी घोषणा
2
होर्मुझच्या नाकेबंदीत अमेरिकेची झाली फजिती; मेथेनॉल घेऊन चीनचा टँकर सुरक्षित बाहेर पडला
3
गेल्या ९ वर्षांपासून अक्षय्य तृतीयेला Gold देतंय जबरदस्त रिटर्न, यावेळीही इतिहासाची पुनरावृत्ती होणार का?
4
अमरावतीत अल्पवयीन मुलींचे अश्लील व्हिडिओ व्हायरल; १९ वर्षीय अयान अहमदला पोलिसांनी केली अटक
5
PNB मध्ये ६० महिन्यांच्या FD मध्ये ₹२,००,००० जमा केले तर किती मिळेल व्याज? पाहा कॅलक्युलेशन
6
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
7
Video - नियतीचा खेळ! वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेली बहीण, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ 'भिकारी' म्हणून आला समोर
8
Noida Protest: हिंसक आंदोलनानंतर अखेर सरकारचा मोठा निर्णय; कामगारांना ३ हजारांची पगारवाढ
9
वैभवला शून्यावर बाद करण्याच्या १०० दिवस आधी, प्रफुल अन् पांड्या यांच्यात 'असं'च काही घडलं होतं
10
Mutual Fund मध्ये भरभरुन पैसे ओतताहेत लोक; ₹७० लाख कोटींच्या पार पोहोचलं AUM
11
Praful Hinge: प्रफुल हिंगेच्या यशाचं गुपित कळलं! वडील म्हणाले, "त्या दोन दिग्गज क्रिकेटपटूंनी माझ्या मुलाला घडवलं"
12
"शेवटचं बोलणंही होऊ शकलं नाही..."; जवळच्या मैत्रिणीच्या निधनानंतर गहिवरल्या मुमताज
13
३ व्रतांचा महासंयोग: प्रदोष-शिवरात्रि, स्वामी स्मरण दिन एकाच दिवशी; ३ उपाय करा, पुण्य मिळवा!
14
डोळ्यात मिरचीची पूड फेकली अन् ५ सेकंदात कोयत्याने केले सपासप वार; महिलेने युवकावर का केला हल्ला?
15
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
16
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याच कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
17
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
18
चैत्र प्रदोष शिवरात्रि योग २०२६: कसे कराल व्रत? ‘असे’ करा शिवपूजन, म्हणा ‘हे’ प्रभावी मंत्र
19
भाजप सोडून नेताजी बोस यांचे पणतू चंद्रकुमार तृणमूलमध्ये, म्हणाले, ‘मी आता चूक सुधारली’
20
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
Daily Top 2Weekly Top 5

ऑफलाईन अर्ज देण्यासाठी भरली जत्रा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 12:58 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत सहाव्या व शेवटच्या दिवशी दीड हजार इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केले. ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रमांतर्गत सहाव्या व शेवटच्या दिवशी दीड हजार इच्छुकांनी नामनिर्देशन दाखल केले. निवडणूक आयोगाचे संकेतस्थळ स्लो चालत असल्याने अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची मुभा देण्यात आली होती. परिणामी, पाच तालुक्यांत निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कक्षात तोबा गर्दी झाली होती. सोबत, तहसील कार्यालयांच्या बाहेरही जत्राच भरल्याचे दिसून आले. दरम्यान दिवसभरात अर्ज दाखल करण्यासाठी वेळोवेळी गर्दी वाढती राहिल्याने प्रशासनावरचा ताण वाढला होता. शहादा व नंदुरबार येथे रात्री उशिरापर्यंत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होती. सायंकाळी अंतिम मुदतीअखेर तळोदा तालुक्यात ७ ग्रामपंचायतीसाठी १८२, धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींसाठी ४१६, नवापूर तालुक्यातील १४ ग्रामपंचायतींसाठी २०५ तर   अक्कलकुवा तालुक्यातील एका ग्रामपंचायतीसाठी तब्बल ३५ अर्ज दाखल झाले आहेत. शहादा व नंदुरबारच्या अर्जांची मोजणी उशिरापर्यंत सुरु असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यात ८७ ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी ५७७ नामनिर्देशन दाखल झाले होते. सोमवारी १३६ जणांनी अर्ज दाखल केले होते. यातून दोन दिवसांंत ७१३ नामनिर्देशन प्रशासनाकडे आले होते. दरम्यान, सीसीएसी सेंटर आणि सायबर कॅफेवर जाऊन अर्ज भरणा-यांना अडचणी येत असल्याचे दिसून आले होते. यातून सर्व्हर स्लो झाल्याने ऑफलाइन अर्ज स्वीकारण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. यातून गर्दी होण्याचा संभव असल्याने पोलीस बंदोबस्त तैनात होता. बुधवारी सकाळी १० वाजेपासून गर्दी वाढण्यास सुरुवात झाल्याने निवडणूक निर्णय अधिका-यांच्या कक्षांमध्ये गोंधळ वाढला होता. सर्वच ठिकाणी अर्ज भरणा करण्यासाठी गर्दी करत असल्याने रांगा लावण्यासाठी पोलीस कर्मचा-यांची मदत घेण्यात आली. 

२८३ प्रभागातून ७६५ सदस्य पदांच्या          जागांसाठी दीड लाख मतदार करणार मतदान  नंदुरबार तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींच्या ७० प्रभागातून एकूण ३७ हजार ९०३ मतदार मतदान करणार आहेत. यात १९ हजार ३२० पुरूष तर १८ हजार ५५३स्त्री मतदार मतदानाचा हक्क बजावण्याची शक्यता आहे. तालुक्यातील तापीकाठालगतची व पूर्ण भागातील काही गावे बिनविरोध हाेण्याची शक्यता आहे.  शहादा तालुक्यातील २७ ग्रामपंचातींच्या ८९ प्रभागातील ४८ हजार ६०६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यात २४ हजार ८७७ पुरूष तर २३ हजार ७२९ स्त्री मतदारांचा समावेश आहे. उशिरापर्यंत तहसील कार्यालयात अर्ज दाखल करणे सुरु होते. तालुक्यातील मोहिदे तर्फे शहादा, सारंगखेडा, असलोद येथील निवडणूकांकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.  नवापूर तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींच्या ४५ प्रभागात निवडणूक होणार आहे. यात २२ हजार ६४९ मतदार सहभागी होणार आहेत. यात १० हजार ८२९ पुरुष तर ११ हजार ९२० महिला मतदारांचा समावेश आहे. यात ढोंग, सागाळी, कोठडा, उमराण व रायंगण या ग्रामपंचायतींच्या निवडणूकीकडे तालुक्याचे लक्ष आहे. धडगाव तालुक्यातील १६ ग्रामपंचायतींच्या ५३ प्रभागात निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. यासाठी २५ हजार ७५२ मतदार सज्ज झाले आहेत. यात १३ हजार ९२ पुरूष तर १२ हजार ६६्० महिला मतदार आहेत. बुधवारी दिवसभरात एकूण २८८ अर्ज दाखल झाले होते. यातून आजअखेर १४ ग्रामपंचायतींसाठी ४१६ नामनिर्देशन दाखल झाले आहेत.  तळोदा तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या २३ प्रभागात निवडणूक कार्यक्रम सुरु आहे. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत१८२ अर्ज दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान एकूण ९ हजार ६३६ मतदार मतदानाचा हक्क बजावतील. यात ४ हजार ६३१ पुरूष तर ५ हजार ३ महिला मतदारांचा समावेश आहे. तालुक्यातील चार ग्रामपंचायती ह्या पुनवर्सन बाधितांच्या ग्रामपंचायती तेथील निवडणूक लक्ष्यवेधी ठरणार आहे. बुधवारी ९५ अर्ज येथे दाखल झाले.