मास्क न लावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2020 12:16 IST2020-04-13T12:14:44+5:302020-04-13T12:16:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मास्क न लावता फिरणाºया तिघांविरुद्ध नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मास्क ...

Filed against three men who did not wear masks | मास्क न लावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

मास्क न लावणाऱ्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मास्क न लावता फिरणाºया तिघांविरुद्ध नंदुरबारात गुन्हा दाखल करण्यात आला.
कोरोना संसर्गाच्या पार्श्वभुमीवर मास्क लावणे किंवा तोंडाला रुमाल बांधणे आवश्यक असतांना महेश वळवी, उषा वळवी व हर्षल माळवे यांनी त्याचे उल्लंघन केले. शहरातून दुचाकीवर जात असतांना त्यांना अडवून पोलिसांनी कारवाई केली व साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला. नागरिकांनी मास्क लावूनच बाहेर पडावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

किराणा दुकानातून तंबाखूचे पाकीट जप्त
नंदुरबार : मंगळबाजारातील किराणा दुकानातून पोलिसांनी तंबाखूचे ५५० रुपये किंमतीचे पाकीट जप्त केले आहे. सध्या तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवर पुर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करून मंगळबाजारातील किराणा दुकानदार जावेद रज्जाक खाटीक यांनी तंबाखूचे पाकीट बाळगले. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title: Filed against three men who did not wear masks