शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
4
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
5
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
6
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
7
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
8
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
9
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
10
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
11
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
12
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
13
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
14
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
15
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
16
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
17
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
18
राज्यभरातील ८,२१२ गृहनिर्माण प्रकल्पांना कारणे दाखवा नोटीस; त्रैमासिक प्रगती अहवाल अद्ययावत न केल्याने ‘महारेरा’ने केली कारवाई
19
भाजपची मित्रपक्षांच्या मदतीने २२ राज्यांत सत्ता; नबीन यांचे खाते उघडले
20
ममता बॅनर्जींना दुहेरी धक्का, सत्ताही गेली-जागाही हरल्या; म्हणाल्या, “भाजपाचा अनैतिक विजय”
Daily Top 2Weekly Top 5

कडब्यासाठी बाहेर जिल्ह्यातील पशुपालकांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:29 IST

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, राणीपूर, धवळीविहीर, रापापूर, कोठार, वरपाडा, गडीकोठडा, अंबागव्हाण, वाल्हेरी, सोमावल, मोदलपाडा आदी विविध गावांच्या ...

सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तळोदा तालुक्यातील प्रतापपूर, राणीपूर, धवळीविहीर, रापापूर, कोठार, वरपाडा, गडीकोठडा, अंबागव्हाण, वाल्हेरी, सोमावल, मोदलपाडा आदी विविध गावांच्या शिवारात मोठ्या प्रमाणात शेतकरी दरवर्षी खरीप ज्वारीची पेरणी करतात. या खरीप ज्वारीला दादर म्हणूनही ओळखले जाते. या परिसरातील तसेच अक्कलकुवा, धडगाव परिसरातील शेतकरीही मोठ्या प्रमाणात खरीप ज्वारीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. ज्वारीच्या कणसाची कापणी केल्यानंतर या परिसरातून मोठ्या प्रमाणात सुका चारा अर्थात कडबादेखील खरीप ज्वारीपासून मिळतो. सध्या तळोदा, अक्कलकुवा तालुक्यातील खरीप ज्वारीची कापणी झाली असून मोठ्या प्रमाणात कडबा निर्माण झाला आहे.

या कडब्याला शिरपूर, शिंदखेडा, नरडाणा, दोंडाईचा, धुळे, पारोळा, चाळीसगाव, मालेगाव या परिसरात दरवर्षी मोठ्या प्रमाणात मागणी असते. मागील आठवडाभरापासून या भागातील पशुपालक व चाऱ्याचे व्यापारी या भागात दाखल झाले असून ज्वारी उत्पादक शेतकऱ्यांपासून कडब्याची खरेदी करीत आहेत. काही जण वाहनाद्वारे परजिल्हात कडबा खरेदी करून घेऊन जात आहेत. ८०० ते एक हजार रुपये प्रती शेकडा या भावाने कडब्याचे बंडल (पुळा) विकले जातात. यावर्षी त्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. एक ट्राली किंवा ट्रकमध्ये ९०० ते एक हजार कडब्याचे बंडल मावतात. एक शेतकरी आपल्या व जवळपासच्या शेतातून मिळून किमान दोन ट्राल्या किंवा ट्रकभर कडबा विक्री करीत आहे. म्हणजे कडबा विक्रीतून आठ ते १० हजार रुपये प्रती वाहन शेतकऱ्याला मिळतात.

अजून पाहिजे त्या प्रमाणात कडबा निघत नसली तरी पशुपालक कडबा उत्पादक शेतकऱ्यांना ॲडव्हान्स देऊन कडबा बुकिंग करून घेत आहे. गेल्यावर्षी मार्च महिन्यापासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे पशुपालकांना कडबा खरेदी करता आला नव्हता. त्याचा परिणाम कडबा उत्पादक शेतकऱ्यांवरदेखील झाला. त्यांचेही हजारांचे नुकसान झाले होते. या पार्श्वभूमीवर सध्या कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. यामुळे परजिल्ह्यातील पशुपालक आतापासून या भागात येऊन कडबा मिळण्यासाठी फिल्डिंंग लावत असल्याचे चित्र दिसून येत आहे.