शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

मादी बिबट्या मृतावस्थेत आढळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:57 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील शेल्टी येथील गावठाण शिवारात कपाशीच्या शेतात रविवारी सकाळी दीड ते दोन वर्ष वय ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील शेल्टी येथील गावठाण शिवारात कपाशीच्या शेतात रविवारी सकाळी दीड ते दोन वर्ष वय असलेली बिबट जातीची मादी गावकऱ्यांना मृतावस्थेत आढळली. शेल्टीच्या पोलीस पाटलांनी वनविभागाला कळविल्यानंतर वनक्षेत्रपाल अनिल पवार आपल्या टीमसह दाखल झाले. पंचनामा केल्यानंतर शवविच्छेदन करून वनविभागाचा काष्ट आगारात शासकीय नियमानुसार अंत्यसंस्कार करण्यात आले.शेल्टी येथे तापी नदीच्या काठावरील गावठाण शिवारात काळा हनुमान मंदिरानजीक कपाशीच्या शेतात बिबट जातीचा वन्यप्राणी हालचाल न करता जमिनीवर पडलेला दिसला. प्रत्यक्षदर्शी प्रथम घाबरले होते. पोलीस पाटील चंद्रकांत शिवाजी पाटील यांनी शहादा वनविभागाचे वनक्षेत्रपाल अनिल पवार यांना घटनेची माहिती भ्रमणध्वनीद्वारे दिली. पवार हे तात्काळ कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी भेट दिली असता संबंधित बिबट जातीची मादी ही मृत अवस्थेत आढळल्याने शासकीय नियमानुसार सोपस्कार पार पाडण्यासाठी शहादा येथील टिंबर डेपोत आणण्यात आले. मृत मादी बिबटचे अंदाजित वय दीड ते दोन वर्ष असावे व वजन साधारणत: ६० किलो असल्याचे अधिकाºयांनी सांगितले. मृत बिबट जातीच्या मादीचे शवविच्छेदन धडगाव येथील पशुधन विकास अधिकारी डॉ.जयेश पाठक यांनी केले. शरीरातील काही भाग न्यायवैद्यक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. या वेळी वनक्षेत्रपाल अनिल पवार, वनपाल एस.एस. इंदवे, एस.एस. देसले, व्ही.जे. तेली, डी.डी. पाटील, एस.जी. मुकाडे, पी.आर. वाघ, ए.एन. तावडे, जे.बी. गिरासे, ए.बी. न्याहाळदे, विनायक पाटील, सागर निकुंभे आदी उपस्थित होतेदरम्यान, मृत बिबट जातीच्या मादीवर येथील काष्ट आगारातील टिंबर डेपोत शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मंडळ अधिकारी अमृतकर आदींसह वनविभागाचे कर्मचारी उपस्थित होते. तिचा मृत्यू हा उपाशी असल्याकारणाने झाला असावा असा कयास पशुवैद्यकीय अधिकाºयांनी लावला.