शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
3
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
4
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
5
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
6
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
7
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
8
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
9
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
10
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
11
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
12
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
13
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
14
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
15
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
16
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
17
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
18
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
19
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

आईची बाजू घेत नेहमी मध्यस्थी करणाऱ्या पुत्राचा पित्याने केला खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर येथे बापाने झोपेत असलेल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तळोदा तालुक्यातील रापापूर येथे बापाने झोपेत असलेल्या मुलाचा खून केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी रात्री घडली होती़ याप्रकरणी बुधवारी रात्री तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला़संदीप लक्ष्मण वसावे (३५) असे मयत युवकाचे नाव आहे़ रापापूर येथील रहिवासी असलेल्या संदीप वसावे याचे वडील लक्ष्मण दोहºया वसावे हे वेळोवेळी किरकोळ वाद उकरुन काढत पत्नीसोबत भांडत होता़ यात संदीप हा मध्यस्थी करुन आईची बाजू घेत वडील लक्ष्ण वसावे यास आवर घालत होता़ या गोष्टीचा राग मनात ठेवत लक्ष्मण वसावे याने मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास घरात झोपलेल्या संदीप याच्या डोक्यात लोखंडी पाईप घालून जखमी केली़ दरम्यान त्याच्या डोक्यासह छाती व पोटावर पाईप मारुन गंभीर जखमी केले़ रक्तस्त्राव झाल्याने संदीप याला तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते़ येथून त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले होते़ परंतू जखम गंभीर असल्याने त्याचा उपचार सुरु असताना मृत्यू झाला होता़याबाबत दिलीप वसावे रा़ रापापूर याच्या फिर्यादीवरुन संशयित लक्ष्मण वसावे याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन गुरुवारी पहाटे पाच वाजता अटक करण्यात आली़ मयत संदीप याची पत्नी नोकरीनिमित्त पुणे येथे वास्तव्यास होती़ ती गावी आल्यानंतर तळोदा पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला़