शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
4
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
5
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
6
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
7
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
8
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
9
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
10
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
11
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
12
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
13
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
14
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
15
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
16
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
17
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
18
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
19
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
20
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी अद्यापही कर्जमाफीपासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी कोणत्याही अटी-शर्ती न ठेवता महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी व नियमित कर्ज भरणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याची घोषणा केली होती.  मात्र या योजनेपासून बरेच शेतकरी अद्यापही वंचित असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.महात्मा ज्योतीबा फुले शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत आपले नाव आधार प्रमाणिकरणाच्या यादीत प्रसिद्ध झाले असून आधार प्रमाणिकरण तातडीने करुन घ्यावे, जेणेकरून कर्जमाफीचा लाभ मिळेल, असा संदेश शेतकऱ्यांना मोबाईलवर शासनाच्या वतीने पाठविले जात आहे. परंतु अद्यापही हा संदेश काही शेतकऱ्यांच्या मोबाईलवर आलेला नाही. त्यामुळे शेतकरी आपले सेवा केंद्र  किंवा बँक शाखेत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र त्यांना रिकाम्या हाताने परत यावे लागत आहे.   ज्या शेतकऱ्यांना असे मेसेज आले आहेत ते बँकेत गेल्यानंतर त्यांना बँकेचे अधिकारी समाधानकारक उत्तरे देत नाहीत. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना तर वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थित आहे. अद्यापपर्यंत एकाही नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ मिळाला नसल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे. या योजनेपासून अद्यापही बरेच शेतकरी वंचित असल्याने  शासनाने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली , अशी भावना व्यक्त होत आहे.

अद्यापही बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमाफी झालेली नसून एकप्रकारे शेतकऱ्यांची थट्टा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. शेतकऱ्यांचे नावे बँकेत रक्कम आलेली नाही  किंवा मेसेजही देण्यात आलेला नाही. संबंधितांनी शेतकऱ्यांची होणारी पिळवणूक थांबवावी व कर्जमुक्त करण्यात यावे.- डॉ.किशोर पाटील, प्रदेश सदस्य, भाजप किसान मोर्चा