शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

पीक कर्जासाठी २२ रोजी शेतकरी मेळावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी जास्तीत जास्त शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. कर्ज मिळविणे सुलभ व्हावे यासाठी २२ जून रोजी जिल्ह्यातील १०५ बँक शाखांमार्फत पीक कर्ज मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी समाजमाध्यमाद्वारे जनतेशी संवाद साधतांना दिली.सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून बँक मेळाव्याच्या माध्यमातून अर्ज स्विकारले जातील व त्याच ठिकाणी कजार्साठी आवश्यक प्रक्रीया पूर्ण केली जाईल. मेळाव्याच्या ठिकाणी शेतकरी उपस्थित राहू शकत नसल्यास ग्रामसेवक किंवा तलाठी यांना अर्ज द्यावेत. हे अर्ज मेळाव्यात आणण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.जिल्ह्यात ३ लाख ९७ हजार ७०४ सातबारे आहेत. १ लाख ६६ हजार शेतकरी शेती करत आहेत. त्यापैकी ६८ टक्के शेतकरी अल्पभूधारक आहेत. १ लाख १७ हजार ८०० शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात येत आहेत. जिल्ह्यात १०५ प्रकारच्या बँक शाखा असून गतवर्षी जिल्ह्याचे पीक कर्जाचे उद्दीष्ट ७२९ कोटी होते. त्यापैकी ४० टक्के उद्दीष्ट गाठण्यात आले होते. या वर्षी ७६९ कोटींचा पीक कर्ज आराखडा बनविण्यात आला आहे.पीक कर्जासाठी शेतकºयांना वेबलिंकवर माहिती भरायची आहे. या माहितीसोबत कजार्साठी वेगळा अर्ज भरायचा आहे. वेब लिंकवरील माहितीवरून जिल्हा प्रशासन बँकाकडे शेतकºयांना कर्ज मिळण्याबाबत पाठपुरावा करणार आहे. बँकांनी १० दिवसात अर्जावर कार्यवाही करून शेतकºयास पीक कर्ज उपलब्ध करून द्यायचे आहे.पीएम किसान योजनेचे लाभार्थी असलेल्या सर्व शेतकºयांना पीक कर्जाचा लाभ मिळणार आहे. अशा लाभार्थी शेतकºयांना सातबारा आणि पीकपेरा अशी दोनच कागदपत्रे अर्जासोबत सादर करावे लागतील. यासोबत नव्याने कर्ज घेणाºया शेतकºयांनादेखील १० दिवसात कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. मागच्या वर्षी कर्जमाफी योजनेत नाव आलेल्या शेतकºयांना रिझर्व्ह बँकेकडून निर्देश आल्यावर कर्ज मिळण्याबाबत निर्णय घेण्यात येईल.ज्यांनी यापूर्वी कर्ज घेतले नसेल त्यांना १ लाख ६० हजारापर्यंत कर्ज देण्यासाठी कर्जाची नोंद सातबाºयावरही घेण्यात येत नाही. अशा शेतकºयांनी अर्जासोबत सातबारा, आधारकार्ड, पॅनकार्ड, आठ अ, फेरफाराची नक्कल, चतु:सिमा, बागायती असेल तर सातबारा विहीरीची नोंद, पीक पेरा प्रमाणपत्र, ऊस लागवड असेल तर साखर कारखान्याचे प्रमाणपत्र आदी १२ कागदपत्रे आवश्यक असतील.