शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाऊस लांबल्यामुळे शेतकरी हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी ...

जयनगर : कोरोना महामारी व नैसर्गिक आपत्तींचा सामना करीत शेतकरी पूर्ण बेजार झाला आहे. जून महिना संपत आला तरी लांबलेल्या पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

जून महिन्याचा शेवटचा आठवडा सुरू झाला असून, पावसाची कोणतीही चाहूल दिसत नसल्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शहादा तालुक्यात जून महिन्यात ७ जूनला चांगल्या प्रमाणात पाऊस झाला होता. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी कापूस लागवड केली होती. मात्र, त्यानंतर पाऊस न आल्याने अनेक शेतकऱ्यांना दुबार लागवडीचे संकट उद्भवले आहे, तर मोजक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली होती.

शहादा तालुक्‍यात महत्त्वाचे व नगदी पीक म्हणून कापसाकडे पाहिले जाते. जून महिना संपत आला तरी पावसाची कोणतीच चाहूल नसल्यामुळे कापसाची लागवड धोक्यात आली आहे. सोबत पेरण्याही लांबत आहेत. त्यामुळे पाऊस कधी येईल आणि पेरण्या होतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे. एकच पाऊस झाल्याने लागवड कमी झाली आहे, तसेच बोटावर मोजण्याइतक्या शेतकऱ्यांनी पेरणी केली असली तरी खरीप हंगाम सुरू होण्याअगोदरच शेतकरी यावर्षी संकटात सापडला आहे.

तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांनी बागायती कापूस लागवड केली असली तरी पाऊस नसल्याने या कापसाच्या वाढीवरही परिणाम झाला आहे. बागायती कापूस लागवड केलेल्या शेतकऱ्यांना पाऊस नसल्यामुळे विहिरी, तसेच कूपननलिकेतील पाणी भरावे लागत आहे. मात्र, जे शेतकरी पावसाच्या पाण्यावर कापूस लागवड, तसेच पेरणी करीत असतात असे शेतकरी आकाशाकडे टक लावून बसले आहेत. तालुक्यात खरीप हंगामात कापसासोबत मूग, उडीद, बाजरी, सोयाबीन, अशी पिके घेतली जातात. मात्र, पाऊस नसल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना यावर्षी पेरणी करता आलेली नाही.

यावर्षी जून महिन्यात शहादा तालुक्‍यात खूपच कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पेरण्या संकटात सापडल्या आहेत. जून महिना संपत आला तरी पेरण्या होऊ न शकल्याने आता शहादा तालुक्यातील शेतकऱ्यांना जुलै महिन्यातच खरिपाच्या पेरण्या कराव्या लागणार आहेत. त्यामुळे पेरण्यांना उशीर होणार असल्यामुळे उत्पन्नात घट येण्याची शक्यता आहे. दीड वर्षापासून कोरोना महामारीचे संकट, तसेच गारपीट, चक्रीवादळाचा धोका, अवकाळी पाऊस आणि आता पाऊस लांबल्याने शेतकरी चहूबाजूंनी आर्थिक संकटाच्या भोवऱ्यात सापडला आहे.