शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील ईव्हीएम मशिन अहमदनगरसाठी झाले रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 7, 2021 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायती आणि सुमारे सहा प्रभाग बिनविरोध झाले आहेत. यातून मतदान ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  जिल्ह्यातील ८७ ग्रामपंचायतींपैकी २३ ग्रामपंचायती आणि सुमारे सहा प्रभाग बिनविरोध झाले आहेत. यातून मतदान केंद्रांची संख्या कमी झाल्याने प्रशासनाचा ताण कमी झाला होता. या पार्श्वभूमीवर नंदुरबार जिल्ह्यातून अडीच हजार ईव्हीएम अहमदनगर जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले. गेल्या दोन दिवसांपासून प्रशासनाकडून ही यंत्रे रवाना करण्यात येत आहेत.जिल्हा प्रशासनाकडे एकूण तीन हजार ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांचा वापर करण्यात आला होता. दरम्यान, जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुका असल्याने मशीनचा वापर होणार असल्याने प्रशासनाकडून त्यांची साफसफाई आणि दुरुस्तीची कामे सुरू होती. या कामांना गती देण्यात येत असतानाच निवडणूक आयोगाने जिल्ह्यातून मशीन्स दुसऱ्या जिल्ह्यात रवाना करण्यात येणार असल्याने सज्ज राहण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामपंचायतींसाठी या मशीन्स पाठवण्यात आल्या आहेत. या संपूर्ण बॅलेट युनिटच्या वाहतुकीसाठी यंदा प्रथमच एसटीच्या मालवाहतूक व्यवस्थेचा वापर करण्यात आला. नंदुरबार आगारातील चार बसेसचा यासाठी वापर करण्यात आला आहे. यापूर्वी ही वाहतूक खाजगी मालवाहतूकदाराकडून करण्यात येत होती. परंतु यंदा प्रथमच एसटीच्या मालवाहतूक सेवेचा वापर करण्यात आल्याने एसटीच्या मालवाहतूक विभागाला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे. येत्या काळात जिल्ह्यात साडेतीनशेपेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम असल्याने सुरू असलेल्या निवडणुका आटोपल्यानंतर पुन्हा जिल्ह्यात मशीन्स मागविण्यात येतील असा अंदाज आहे. दरम्यान प्रशासनाला गरजेच्या असलेल्या ईव्हीएम मशीन्स तयार करून त्या तालुकास्तरावर रवाना करण्याचे कामकाजही सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. येत्या दोन दिवसांत तहसील कार्यालयात हे मशीन्स पोहोचून त्याठिकाणी पुढील कामकाजाला सुरुवात होणार असल्याचे समजते.