शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: तिकडे अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’, इकडे सांगलीमध्ये गारांसह वादळी पाऊस!
2
Tamil Nadu Explosion: तामिळनाडूतील फटाका कारखान्यात भीषण स्फोट; २३ जण ठार, अनेक गंभीर जखमी
3
आजचे राशीभविष्य, २० एप्रिल २०२६: कार्यात यश, स्वादिष्ट भोजन; काहीसा वेगळा दिवस
4
Akshay Tritiya: अक्षय्य मुहूर्तावर १ हजार कोटींची सुवर्णझळाळी
5
नाश्त्यावरून वाद, कार्यकर्त्यांसमोरच नगरसेविकेने जिल्हाध्यक्षांना लगावली कानशिलात!
6
Middle East War: करार करा अन्यथा तुमचा विनाश अटळ; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
Drugs Racket: टिटवाळ्याच्या आलिशान घरातून ‘ती’ मुंबईत चालवत होती ड्रग्ज रॅकेट!
8
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
9
लेख: तहान लागल्यावर विहीर खोदायची, तर कोरड पडणारच !
10
आजचा आग्रलेख: विमान सुरक्षेचे पंख वाऱ्यावर, प्रवाशांचा जीव टांगणीला!
11
विशेष लेख: उपकार नव्हेत, हा महिलांचा हक्क आहे!
12
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
13
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
14
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
15
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
16
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
17
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
18
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
19
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
20
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
Daily Top 2Weekly Top 5

ख्रिस्ती बांधवांमध्ये संचारला उत्साह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : काही महिन्यांपासून ख्रिस्ती बांधवांच्या प्रतिक्षेतील ख्रिसमस अर्थात येशू ख्रिस्त जन्मोत्सवाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : काही महिन्यांपासून ख्रिस्ती बांधवांच्या प्रतिक्षेतील ख्रिसमस अर्थात येशू ख्रिस्त जन्मोत्सवाला सुरूवात झाली आहे. यानिमित्त नंदुरबारात विविध उपक्रम राबविण्यात येत असून संपूर्ण ख्रिस्ती बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.नंदुरबार शहरात सुवार्ता अलायन्स चर्चकडून फ्रॅँकलीन मेमोरियल चर्चची पायाभारणी करण्यात आली. त्या माध्यमातून मागी १४ वर्षांपासून या चर्चच्या माध्यमातून येथील सभासद ख्रिस्ती बांधव सामाजिक सलोखा जपत समाजासाठी विविध उपक्रम राबवित योगदान देत आहे. सुवार्ता अलायन्स चर्चचे तत्कालीन अध्यक्ष प्रेमदास कालू यांच्या मार्गदर्शनाने २००४ मध्ये मिशन कंपाउंडमध्ये चर्चच्या बांधकामास सुरुवात करण्यात झाली. याठिकाणी वर्षभर विविध धार्मिक व्याख्याने, रविवारी प्रार्थना, बालक, महिला आणि युवक - युवती व सर्वसाधारण बांधवांसाठी कार्यक्रम घेण्यात येत आहे. वर्षभर साजरा होणाऱ्या या कार्यक्रमां सोबतच संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक कार्यही सुरू आहे. यांतर्गत आश्रमशाळा, माध्यमिक शाळा, तांत्रिक शिक्षण देणारे दालन निर्माण करण्यात येऊन ख्रिस्ती बांधवांसोबत सर्व जाती - धर्मातील गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण दिले जात आहे. क्रीडा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजनही चर्चच्या माध्यमातून करण्यात येते.सुवार्ता अलायन्सचे अध्यक्ष डॉ. राजेश वळवी यांच्या मार्गदर्शनाखाली येथे नाताळनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवारी नाताळनिमित्त प्रार्थनेसह धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती देण्यात आली. उपक्रमांसाठी प्रमुख वक्ते म्हणून चैन्नईचे रेव्ह. रिचर्ड थिंगारण, रेव्ह. जी.इ.जयकर, रेव्ह.अनुप वळवी, पा.सागर कालू, अंकाश पाडवी, रेव्ह. आर.के.वळवी व रेव्ह. जे.एच.पठारे आदी उपस्थित राहणार आहे. यासाठी सेक्रेटरी पी.डी. लवणे, सुरेश जांबीलसा, पाहलास वाघमारे, राजेंद्र व्यास, दिलीप वळवी, मार्था आक्का, ज्युलियाना गायकवाड, सत्यजित नाईक, सबस्टिन जयकर, अजय वळवी, डॉ.मधूकमल हिवाळे यांनी परिश्रम घेतले.आयर्लंडच्या बर्फाळ प्रदेशात सेंट निकोलस नावाचा एक ख्रिश्चन धर्मगुरू होता. त्या धर्मगुरूला लहान मुले खुप आवडत असल्याने तो मुलांना नेहमीच विविध भेट वस्तु व खाऊ देत होता. त्यामुळे तो बालकांना सर्वाधिक आवडणारा धर्मगुरू ठरला. काही कालावधीनंतर त्याची सांताक्लॉज अशी ओळख निर्माण झाली. त्यामुळे सांताक्लॉज व नाताळ अर्थात येशू ख्रिस्त जन्मोत्सव हे दोन्ही वेगवेगळे विषय असल्याचे सुवार्ता अलायन्स चर्चचे धर्मगुरू रेव्ह.अनुप वळवी यांनी सांगितले.बर्फाळ प्रदेश पांढरे शुभ्र असल्याने त्यात लाल रंग नेहमीच उठून दिसतो. खरं तर लाल रंग बालकांना नेहमीच आवडत असल्याने सांताक्लॉज हा नेहमी लालच कपडे परिधान करीत होता. त्याच्या पश्चात सांताक्लॉज हा दंतकथेत आला, त्यामुळे त्याची मोठी ओळख निर्माण झाली असून त्याचा बालयबलमध्ये कुठेही उल्लेख आढळून येत नाही. त्यामुळे सांताक्लॉज व नाताळ हे होन्ही विषय परस्परपूरक नसल्याचे चर्चे सेक्रेटरी पी.डी.लवणे यांनी सांगितले.खºया अर्थाने नाताळ हा सण प्रत्येक बांधवांसाठी असला तरी बालकांमध्ये या उत्सवात बालकांमध्ये सर्वाधिक उत्साह असून मुलांना आवडणारा सांताक्लॉजच्या प्रतिमा, कपडे यांच्या माध्यमातून व्यापारही सुरू झाला. त्यामुळे नाताळच्या कालावधीत याला मागणी वाढत गेल्याने या उत्सवाशी सांताक्लॉजचा संबंध जोडला गेल्याचे म्हटले जात आहे.