नोकरदार विवाहितेचा 15 लाखासाठी छळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2019 12:45 IST2019-11-28T12:45:09+5:302019-11-28T12:45:15+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : पतीच्या नोकरीसाठी नोकरी करणा:या विवाहितेने 15 लाख रुपये द्यावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या ...

Employee wealth harassed for 15 lakhs | नोकरदार विवाहितेचा 15 लाखासाठी छळ

नोकरदार विवाहितेचा 15 लाखासाठी छळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : पतीच्या नोकरीसाठी नोकरी करणा:या विवाहितेने 15 लाख रुपये द्यावे यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या दहा जणांविरुद्ध 26 नोव्हेंबर रोजी उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
नंदुरबार येथील माहेर व घोटाणे येथील सासर असलेल्या प्रिया सतिष बागुल या महिलेचा सतिष अशोक बागुल यांच्याशी विवाह झाला होता. प्रिया या नोकरी करणा:या असल्यामुळे त्यांनी बेरोजगार पतीच्या नोकरीसाठी 15 लाख रुपये द्यावे म्हणून त्यांच्यामागे दोन वर्षापासून तगादा लावला जात होता. शिवाय चारित्र्याचाही संशय घेतला जात होता. त्याला कंटाळून प्रिया बागुल यांनी उपनगर पोलिसात फिर्याद दिली. त्यावरून पती सतिष अशोक बागुल यांच्यासह अशोक मोतिराम बागुल, उषाबाई अशोक धनगर, समाधान अशोक धनगर, हिलाल पोपट लांडगे, आशाबाई हिलाल लांडगे, महेंद्र हिलाल लांडगे, मिराबाई भिका मुजगे, अनिता अनिल धनगर सर्व रा.घोटाणे व राणीपूरा, दोंडाईचा यांच्याविरुद्ध उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार सुनंदा गावीत करीत आहे.
दरम्यान, या संदर्भात प}ी प्रिया बागुल व सासरची मंडळी हे पोलीस अधीक्षक कार्यालयातील महिला तक्रार निवारण कक्षात गेले होते. तेथे समेट करण्याचा प्रय} झाला. परंतु समेट न झाल्याने तक्रार निवारण कक्षातून पत्र गेल्यानंतर उपनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला.     

Web Title: Employee wealth harassed for 15 lakhs