जिल्ह्याला रॅपिड अँटिजेनच्या आठ हजार किट उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:13+5:302021-04-23T04:33:13+5:30

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मात्र किट संपल्याने चाचण्यांचा वेग कमी झाला होता. शिवाय ...

Eight thousand kits of rapid antigen available to the district | जिल्ह्याला रॅपिड अँटिजेनच्या आठ हजार किट उपलब्ध

जिल्ह्याला रॅपिड अँटिजेनच्या आठ हजार किट उपलब्ध

जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांपासून मात्र किट संपल्याने चाचण्यांचा वेग कमी झाला होता. शिवाय शहरात ठिकठिकाणी चाचण्यांची व्यवस्था करण्यात आली होती तेथे देखील सामसूम राहत होते. आरोग्य विभागाकडून किट मिळावे यासाठी जिल्हा आरोग्य विभागाने मागणी केली होती. त्यानुसार आठ हजार किट प्राप्त झाल्या आहेत. त्यांचे वाटप करण्यात आले असून गुरुवार सकाळपासून ठिकठिकाणी रॅपिड चाचण्यांना सुरुवात झाली आहे.

आरोग्य विभागाच्या माहितीनुसार कोरोना नियंत्रणाची उपाययोजना करण्यासोबत संपर्क साखळी खंडित करण्यासाठी कोरोना चाचण्यांनादेखील तालुकास्तरावर गती देण्यात येत आहे. तळोदा तालुक्यासाठी आज १५०० किट, नंदुरबारसाठी दोन हजार, शहादासाठी दोन हजार, अक्कलकुवा, धडगाव आणि नवापूर तालुक्याला प्रत्येकी ७०० किट देण्यात आल्या असून ४०० ऐनवेळच्या उपयोगासाठी ठेवण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन बोडके यांनी दिली आहे. जिल्हा रुग्णालयाकडून आरोग्य यंत्रणेला एकूण आठ हजार किट प्राप्त झाल्या होत्या.

Web Title: Eight thousand kits of rapid antigen available to the district