शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सुविधेअभावी प्रवाशांच्या घशाला कोरड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2019 11:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बसस्थानकावर पिण्याच्या पाण्यासाठी निर्माण करण्यात आलेली पाणपोई गेल्या सहा महिन्यांपासून बंद पडली आह़े यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असून पाणी खरेदी करुन प्यावे लागत आह़े याकडे परिवहन महामंडळाने लक्ष द्यावे यासाठी नागरिकांनी पाठपुरावा केला होता़  नंदुरबार जिल्ह्याचा विकास व प्रवाशांचा वाढता विस्तार लक्षात घेत आठ वर्षापूर्वी नंदुरबार आगारामार्फत बसस्थानकाचाही विस्तार करण्यात आला. बस्थानकाच्या उद्घाटनप्रसंगी प्रवाशाना अपेक्षीत असलेल्या सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या होत्या. पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी बसस्थानकावर दोन ंठिकाणी नळही बसविण्यात आले होते. परंतु अवघ्या काही वर्षातच तेथील दोन्ही सुविधांची दुरावस्था झाली. ही सुविधा अद्याप दुरुस्ती करण्यात आली नसल्यामुळे तीन राज्यातून येणा:या प्रवाशांना पाण्याअभावी समस्यांना सामोरे जावे लागत आहे. बसस्थानकावर पहाटे पाच वाजेपासून रात्री नऊ वाजेर्पयत प्रवाशांची नेहमी वर्दळ असते. त्यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज  भासते. बसस्थानकाजवळ कुठलीही पाण्याची सार्वजनिक व्यवस्था नसल्यामुळे प्रवाशांना पिण्याच्या पाण्यासाठी केवळ बाटलीच्या  पाण्यावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यांना यासाठी 20 रुपयाचा भरूदडही सहन करावा लागत आहे. या बसस्थानकावर दैनंदिन येणा:या बसेसची संख्या अन्य बसस्थानकांच्या तुलनेत सर्वाधिक असून प्रवाशांची संख्याही अधिक आहे. पाण्याच्या असुविधेला परिवहन महामंडळ जबाबदार आहेत, तेवढेच प्रवासी तथा जनतेला देखील जबाबदार धरले जात आहे. मुद्दा सार्वजनिक व्यवस्थेचा असला तरी प्रवाशांची कुठलीही गैरसोय होणार नाही, याची काळजी परिवहन महामंडळाला घ्यावी लागणार आहे. तर बसस्थानकावरील सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेत तेथील सुविधा अबाधित ठेवण्याची देखील आपण प्रत्येकाची जबाबदारी असल्याचे म्हटले जात आहे. त्यानुसार तातडीने  सुविधा करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून  करण्यात येत आहे. प्रवाशांच्या या मागणीची  परिवहन महामंडळ कितपत दखल घेते, याकडे या बसस्थानकावरुन प्रवास करणा:या प्रत्येक प्रवाशांचे लक्ष लागून आहे.