शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

मूर्ती खरेदीसाठी गर्दी करू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:44 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार शहरातील गणेश भक्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाचे सर्व नियम पाळून गणेश मूर्तींची खरेदी ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार शहरातील गणेश भक्तांनी कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासन-प्रशासनाचे सर्व नियम पाळून गणेश मूर्तींची खरेदी करावी, असे आवाहन नंदनगरी श्री गणेश मूर्ती स्टॉल संघटनतर्फे करण्यात आले आहे.
नंदुरबार शहारातील गणेश भक्तांसाठी या कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमानुसार नंदनगरी श्री गणेश मूर्र्ती विक्री स्टॉल संघटना आपल्या सेवेत सज्ज झाली आहे. येत्या दि.२२ आॅगस्ट रोजी महाराष्ट्राचे लाडके आराध्य दैवत श्रीगणेशाचे आगमन होत आहे. कोरोना महामारी लक्षात घेत शासनाने व प्रशासनाने जाहिर केलेल्या सुचनांचे पालन करत श्रीच्या आगमनाची तयारी सुरु झाली. सर्व गणेश भक्तांसाठी सुंदर व आकर्षक श्री गणेश मुर्तींचे स्टॉल विक्रीसाठी सज्ज झाले आहे.
विशेषत: या संघटनेतर्फे सर्व भक्तांसाठी आवाहन करण्यात येते की, या महामारीच्या पार्श्वभूमीवर सर्व गणेश भक्तांनी आपल्या आवडीच्या गणेश मूर्र्ती लवकरात लवकर खरेदी करुन आपल्याजवळ ताब्यात घेणे आवश्यक आहे. यामुळे सणासुदीच्या आनंद व्दिगुणी करता येणार आहे. या काळात रहदारी, देवाण-घेवाण, कोणत्याही प्रकारची गर्दी होऊ नये व सोशल डिस्टन्सचे पालन करावे. शक्यतोवर सोबत लहान मुले किंवा ६० वर्षावरील जेष्ठ नागरीकांनी या खरेदीच्या वेळेस येऊ नये. जेणे करुन आपण व आपल्या परिजनांना या महामारीपासून आपण त्यांचे संरक्षण करुन स्वता: सुरक्षित रहाल. सहसा या गर्दीपासून लांब असणे आवश्यक आहे. कदाचित आपण गणेश मूर्ती नेताना कुठे कोरोना आपल्या घरी घेऊन तर नाही जाताय ना? याची काळजी घेणे आवश्यक आहे, असे आवाहन नंदनगरी श्री गणेश मुर्ती स्टॉल संघटनतर्फे करण्यात आले आहे.