शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

वाढदिवसाच्या खर्चातून उपजिल्हा रुग्णालयाला दिले दाेन ऑक्सिजन बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:22 IST

सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेडस उपलब्ध होत नसून ऑक्सिजनला देखील मोठ्या प्रमाणात ...

सध्या कोविड-१९ चा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. रुग्णालयात रुग्णांना उपचारासाठी बेडस उपलब्ध होत नसून ऑक्सिजनला देखील मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. अनेकांना रुग्णालयाचा बाहेर रुग्णांवर उपचार घ्यावे लागत असल्याचे चित्र आहे. कोविडच्या या भयावह परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्वतः चा वाढदिवस साजरा न करता त्या खर्चातून उपजिल्हा रुग्णालयात कोरोना रुग्णांच्या सोयीसाठी दोन ऑक्सिजन बेड देण्याचा निर्णय तळोदा नगरपालिकेचे प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी घेतला.

त्यानुसार मंगळवारी माजी आ. उदेसिंग पाडवी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ महेंद्र चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पाटील, नगरसेविका अनिता परदेशी,माजी पोलीस उपनिरीक्षक केसरसिंग क्षत्रिय, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी,योगेश मराठे,नैवेद्य फाउंडेशनचे योगेश चव्हाण,दद्दू दुबे,हरीश जोशी,आशिष बारी,आदींच्या उपस्थितीत या ऑक्सिजन बेडचे लोकार्पण करण्यात आले.

याप्रसंगी मनोगत व्यक्त करताना माजी आमदार उदेसिंग पाडवी यांनी नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व प्रत्येकाने कोरोनाच्या विरुद्धच्या युद्धात आपले योगदान देण्याचा प्रयत्न केला पाहिजे,असे आवाहन केले. नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय यांनी उपलब्ध करून दिलेल्या बेडचे लोकार्पण झाल्यानंतर काही क्षणांतच त्यापैकी एका बेड हा एका कोरोनाग्रस्त रुग्णांच्या उपयोगी आल्याचे दिसून आले. यशस्वीतेसाठी भरत चौधरी,आदिल शेख,कमलेश पाडवी,लकी ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

फोटो : ऑक्सिजन सिलिंडर व बेडचे लोकार्पण करताना माजी. आम. उदेसिंग पाडवी,तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विजय पाटील,नगरसेवक हितेंद्र, नगरसेविका अनिता परदेशी, सामाजिक कार्यकर्ते संदीप परदेशी,योगेश मराठे,आदी