शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सातपुडय़ात बंद बससेवेनेच साजरी होणार दिवाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:12 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळत रस्तेही वाहून गेले. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील परिवहन महामंडळामार्फत 20 ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार: ऑगस्टमधील अतिवृष्टीमुळे दरड कोसळत रस्तेही वाहून गेले. त्यामुळे अक्कलकुवा ते मोलगी भागातील परिवहन महामंडळामार्फत 20 बसफे:या बंद करण्यात आल्या. रस्त्याची दुरुस्ती झाली असली तरी बससेवेला अनुकुल नसल्याने बस सुरू करण्यात आली नाही. आचारसंहिता असल्यामुळे रस्त्याचे पुढील काम थांबविण्यात आले आहे. याच कालावधीतील दिवाळी सातपुडय़ात बससेवेविनाच साजरी होणार आहे.  न रहे. दोन महिन्यांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीत अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात तब्बल 13 ठिकाणी दरडी कोसळल्या व रस्ताही वाहून गेला. शिवाय दुर्गम भागातील काही रस्त्यांचीही दुरावस्था झाली. त्यामुळे अक्कलकुवापासून मोलगी व धडगावर्पयत दिली जाणारी बससेवा परिवहन महामंडळामार्फत बंद करण्यात आली. देवगोई घाटातील रस्त्याची काही प्रमाणात दुरुस्ती झाली असली तरी हा रस्ता मोठी वाहतुक बससेवेसाठी प्रतिकुलच ठरत आहे. रस्त्याची दुरुस्ती सुरू असतानाच आचारसंहिता लागू झाल्यामुळे पुढील कामात व्यत्यय आला असून सद्यस्थितीत हे काम बंदच आहे. त्यामुळे बससेवाही पूर्ववत करण्यात आली नाही. त्यात अक्कलकुवा आगारामार्फत 15 तर याच मार्गावरुन धडगावर्पयत जाणारी नंदुरबार आगाराची एक बस अशा 16 बसफे:या बंद आहे. त्यात अक्कलकुवा ते मोलगी, कोठली, भगदरी, धडगाव, जमानामार्गे धडगाव, डाब, जमाना, बिजरीगव्हाण व नंदुरबार ते धडगाव आदी बसेसचा समावेश आहे. या पाठोपाठ तळोदा ते चांदसैली रस्ताही ठिकठिकाणी तुटल्यामुळे या मार्गाने सुरू असलेल्या मिनी बसच्या चारही बसफे:या नंदुरबार आगारामार्फत बंद करण्यात आल्या आहे. त्यामुळे यंदाच्या अतिवृष्टीने सातपुडय़ातील नागरिकांवर पायी प्रवास लादल्याचे म्हटले जात आहे. सर्वच बसफे:या बंद केल्या असून या दोन्ही मार्गावर केवळ खाजगी प्रवासी वाहतुक करणारी वाहनेच सुरू आहे. याच वाहनातून धडगाव-मोलगी परिसरातील नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. आचारसंहिता कालावधीतच यंदाची दिवाळी साजरी होणार असून नोकरी तथा कामधंद्यानिमित्त बाहेरगावी गेलेले सातपुडय़ातील आदिवासी दिवाळीसाठी गावाकडे परतु लागली आहे. परंतु बससेवा  बंद असल्याने त्यांना खाजगी  प्रवासी वाहनानेच जावे लागत आहे. दिवाळी साजरी होईर्पयत आचारसंहिता संपणार नसून रस्त्याचे कामही पूर्ण होणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गम भागातील 

दिवाळीत अस्तंबा ता.धडगाव येथील अश्वस्थामा यात्रा भरविली जाते. या  यात्रेला नंदुरबार जिल्ह्यासह परराज्यातूनही भाविक येत असतात. भाविकांची संख्या लक्षात घेत अक्कलकुवा आगारामार्फत दरवर्षी वाढीव बसफे:याही सुरू करण्यात येतात. ही यात्रा दिवाळीच्या हंगामात महामंडळाला अपेक्षेनुसार उत्पन्न मिळवून देते. परंतु यंदा वाहतुकच बंद असल्यामुळे अश्वस्थामा यात्रेतून परिवहन महामंडळाला मिळणा:या नियमित  उत्पन्नासह वाढीव उत्पन्नही यंदा मिळणार नाही.