नंदुरबार जिल्ह्यात 20 दिवसात साडेदहा लाखांची दारू जप्त

By Admin | Updated: April 20, 2017 15:54 IST2017-04-20T15:54:05+5:302017-04-20T15:54:05+5:30

जिल्हा पोलिसांनी 20 दिवसात 10 लाख 47 हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली.

In the district of Nandurbar, liquor was seized between 20 days and 20 days | नंदुरबार जिल्ह्यात 20 दिवसात साडेदहा लाखांची दारू जप्त

नंदुरबार जिल्ह्यात 20 दिवसात साडेदहा लाखांची दारू जप्त

नंदुरबार,दि.20- जिल्हा पोलिसांनी 20 दिवसात 10 लाख 47 हजार रुपयांची अवैध दारू जप्त केली. महामार्गालगत दारू विक्री दुकाने बंद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. 

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून महामार्गाच्या 500 मीटरच्या आतील दारू दुकाने बंद झाल्यानंतर जिल्हा पोलिसांनी विविध ठिकाणी धाड टाकून कारवाई केली. जिल्ह्यात गावठी दारू व अवैध दारू वाहतुकीविरोधात धडक मोहिम राबविण्यात आली. जिल्हाभरात एकुण 137 केसेस करण्यात आल्या. त्याअंतर्गत 137 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली. एकुण सहा लाख 10 हजार 385 रुपयांची दारू जप्त करण्यात आली. त्यातील तीन लाख 39 हजार 260 रुपये किंमतीचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. एकुण नऊ लाख 49 हजार 645 रुपये किंमतीचा मुद्देमाल या मोहिमेअंतर्गत हस्तगत करण्यात आला. 
दरम्यान, 17 रोजी स्थानिक गुन्हे शाखेस मिळालेल्या माहितीवरून म्हसावद हद्दीत अवैध दारू तस्करी करणारे वाहन (क्रमांक एमएच 20-बीवाय 7382) पकडण्यात आले. त्यात एक लाख 98 हजार 100 रुपये किंमतीची देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेंद्र डहाळे, अपर अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गिरीश पाटील व पथकाने केली.

Web Title: In the district of Nandurbar, liquor was seized between 20 days and 20 days