शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

स्वॅब तपासणीत जिल्हा दुर्लक्षीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मुंबईसारख्या हाय रिस्क भागातून आलेल्या सात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे १०५ अहवाल धुळे ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मुंबईसारख्या हाय रिस्क भागातून आलेल्या सात कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींचे स्वॅबचे १०५ अहवाल धुळे येथील प्रयोग शाळेने वेटींगवर ठेवल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. जिल्हा रुग्णालय व जिल्हा प्रशासनाने याबाबत धुळे प्रयोगशाळेकडे पाठपुरावा केला आहे.
हायरिस्क भागातून आलेल्या रुग्णांमुळे संपर्कातील इतरांना लागण होण्याची शक्यता जास्त असल्याची भिती आरोग्य विभागाला आहे. त्यामुळे काही जणांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले असून संबधितांच्या रहिवास क्षेत्राकडेही लक्ष ठेवण्यात आले आहे. शिवाय अशा लोकांकडून त्यांची संपर्क साखळीचीही माहिती आधीच घेवून ठेवण्यात आली आहे.
रजाळे येथील सहाजण मुंबई रिटर्न आहेत. ते हाय रिस्क भागातून आलेले असल्यामुळे विशेष दक्षता घेतली जात आहे. तीन दिवसांपूर्वीचे ४२ व दोन दिवसांपूर्वीचे २८ आणि रविवारचे ३५ असे १०५ अहवाल वेटींगवर आहेत. याशिवाय जिल्हा रुग्णालयातील दोन कर्मचाऱ्यांच्या संपर्कातील इतर कर्मचाऱ्यांचेही अहवाल त्यात अडकले असल्याने जिल्हा रुग्णालयात चलबिचलता वाढली आहे.
जळगाव, मालेगावला प्राधान्य
धुळे येथील प्रयोगशाळेत जळगाव, मालेगाव व धुळे विभागातील सर्वाधिक स्वॅब येतात. हे भाग हायरिस्क झोनमध्ये आहेत. तेथील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कातील लोकांच्या कोरोनाचे निदान जलदगतीने व्हावे यासाठी सुचना देण्यात आलेल्या आहेत. जेणेकरून संबधीत ठिकाणी उपाययोजना करता येणे, प्रतिबंधात्मक उपाय करणे याला प्राधान्य देता येते. त्यामुळे मालेगाव, जळगाव व धुळे येथील दररोज जास्तीत जास्त स्वॅब नमुने तपासण्याचे काम या प्रयोगशाळेत केले जात आहे.
तीन दिवस: अहवाल नाही
गेल्या तीन दिवसात नंदुरबारचे एकही अहवाल प्राप्त झाले नाहीत. वास्तविक हायरिस्क भागातील कोरोना रुग्ण नंदुरबार जिल्ह्यात असल्याने आरोग्य विभागाची चिंता वाढली आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना क्वॉरंटाईन करण्यात आले असले तरी त्यांच्या स्वॅबचे नमुने काय येतात याबाबत आरोग्य विभागासह त्या त्या कुटूंबातील नातेवाईक आणि गावकरीही चिंतेत आहेत.
नंदुरबार सिव्हीलकडून गुरुवारी रात्री ४२ स्वॅब पाठविण्यात आले होते. शुक्रवार व शनिवारी २८ तर रविवारी ३५ स्वॅब पाठविण्यात आले आहेत. तीन ते चार दिवसात एकुण १०५ स्वॅब पाठविण्यात आलेले आहेत. परंतु गुरुवारपासून एकाही स्वॅबचे अहवाल रविवारी रात्रीपर्यंत मिळालेले नव्हते.
सोमवारी आणखी काही स्वॅब पाठविले जाणार आहेत. स्वॅब पाठविण्याचे प्रमाण कायम असले तरी येणाºया अहवालांची संख्या निरंक राहत असल्याने आरोग्य विभाग आणि सिव्हीलचे अधिकारीही हैराण झाले आहेत.
बाहेरून येणाºयांचा ओघ
जिल्ह्यात बाहेरगावाहून येणाºयांचा ओघ सुरूच आहे. अनेक शहरी भागात बाहेरून येणारे कुठलीही माहिती देत नाही. वसाहतींमधील नागरिकही वाईटपणा नको म्हणून तक्रारी करीत नाहीत. यामुळे मात्र रिस्क वाढत आहे. मुंबई, पुणे, नाशिक, जळगावसह इतर भाग हायरिस्क म्हणून ओळखले जात आहे. सध्या रहदारीची सूट दिली जात आहे. सहज पास उपलब्ध होत आहेत. त्यामुळे येणाºया-जाणाºयांचे प्रमाण वाढले आहे. त्यातून मात्र संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
बाहेर गावाहून येणाºयांनी कुठलीही माहिती न लपवता आरोग्य तपासणी करून घेणे आवश्यक आहे. प्राथमिक लक्षणे दिसली तरच स्वॅब घेतले जातात किंवा क्वॉरंटाई केले जाते. अन्यथा सुचना देवून घरी पाठविले जाते. त्यामुळे प्रत्येकाने आरोग्य विभागाला माहिती देणे आवश्यक असल्याचे आरोग्य विभागाची अपेक्षा आहे.

नवापूरच्या सिमेवरील गुजरातमधील उच्छल येथे आढळलेल्या रुग्णामुळे शहरात विशेष दक्षता घेतली जात आहे. रुग्ण महिलेच्या पतीचे नवापूरात हॉटेल असून तेथे नेहमीच गर्दी राहत असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे. प्रशासनाने ठिकठिकाणी बॅरिकेटींग करून रस्ते बंद केले आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.