राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:29 IST2021-02-14T04:29:30+5:302021-02-14T04:29:30+5:30

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या चारही जिल्ह्यातील राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत नंदुरबार ...

District Executive of Political Science Junior College Council announced | राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची जिल्हा कार्यकारिणी जाहीर

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, नंदुरबार व धुळे या चारही जिल्ह्यातील राज्यशास्त्र विषयाच्या प्राध्यापकांची ऑनलाइन बैठक झाली. या बैठकीत नंदुरबार जिल्हा राज्यशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयीन परिषदेची कार्यकारिणीची घोषणा विभागीय अध्यक्ष प्रा.श्याम दुसाने यांनी केली. त्यात नंदुरबार जिल्हाध्यक्षपदी प्रा.चंद्रकांत विसपुते, महासचिव प्रा.युवराज पाटील, ज्येष्ठ सल्लागारपदी प्रा.पुरुषोत्तम पटेल, उपाध्यक्ष प्रा.जोत्स्ना पाटील, प्रा.बाबूलाल पावरा, प्रा.संगम यशोद, प्रा.रामसिंग वळवी, सहसचिव प्रा.रमेश पावरा, कोषाध्यक्ष प्रा. घनश्याम सोनवणे, कार्याध्यक्ष प्रा.भानुदास वसावे, जिल्हा महिला प्रमुख प्रा.गीता राजपूत, प्रसिद्धी प्रमुख प्रा.सूरज वसावे तर सदस्यपदी प्रा.प्रशांत सोनवणे, प्रा.बाबासाहेब राक्षे, प्रा.अब्दुल खालीक शेख रशीद, प्रा.गुणवंत बाविस्कर, प्रा.लक्ष्मीकांत शेंडे यांची निवड करण्यात आली.

राज्यशास्त्र विषयाच्या अनुषंगाने अभ्यासक्रमाचे नियोजन, विषय अध्यापकांना येणाऱ्या अडचणी व त्यांचे निराकरण करणे, विद्यार्थ्यांना राज्यशास्राची आवड निर्माण करण्यासाठी नियोजन करणे आदींबाबत कार्यकारिणी कार्य करणार असल्याची माहिती अध्यक्ष प्रा.चंद्रकांत विसपुते यांनी दिली. प्रास्ताविक विभागीय सचिव प्रा.संजय सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन प्रा.संजय पाडवी, परिचय प्रा.वासंती पेठे यांनी तर आभार प्रा.धीरेंद्र ठाकरे यांनी मानले.

Web Title: District Executive of Political Science Junior College Council announced