शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

हरित सातपुडा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 12:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : हरित सातपुडा अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : हरित सातपुडा अभियान राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बिरसामुंडा सभागृहात शिक्षण विभागाची बैठक झाली.बैठकीस परिविक्षाधीन उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही. कदम, प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.आर. रोकडे, उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण, तालुक्यांचे गटशिक्षणाधिकारी, शिक्षक आदी उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ.भारूड म्हणाले की, जिल्ह्यात अभियानांतर्गत प्रत्येक शाळेच्या परिसरातील मोकळी जागा, टेकडी तसेच उपलब्ध डोंगर व मैदाने याठिकाणी वृक्ष लागवड करावयाची आहे. प्रत्येक शाळेत उपलब्ध सुविधेनुसार नर्सरी उभारणे, मातीनाला बांध तयार करणे, पाणी अडवणे-जिरवणे यासारखे उपक्रम प्रात्यक्षिक स्वरूपात विद्यार्थ्यांना सोबत घेऊन करायचे आहेत. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची तीन गटात विभागणी करून त्यांना समजेल अशा स्वरूपात चित्र व मोजक्या शब्दांच्या माध्यमातून पुस्तक तयार करून आठवड्यातून अर्धातास वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्षांची जोपासणा करणे याबाबतचे संस्कार विद्यार्थ्यांवरकरावयाचे आहेत, असे सांगीतले.पुस्तक तयार करतांना झाडाचे महत्व, त्यापासून मिळणारी सावली, वनौऔषधी उपयोग, पक्ष्यांना होणारा फायदा, जमिनीची धुप न होऊ देण्यात झाडांची भुमिका, मिळणारी फळे, झाडापासून मिळणारे आॅक्सीजन, पर्यावरण रक्षणात झाडांची भुमिका याबाबत चित्रात्मक स्वरूपात व बोलीभाषेत मजकूर तयार करावा. वृक्षारोपणासाठी मोठ्या प्रमाणात रोपांची आवश्यकता असल्याने &शाळा तेथे रोपवाटीका हा उपक्रमदेखील घेण्याचे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी याप्रसंगी केले.ही योजना यशस्वी करण्यासाठी तंत्रस्नेही शिक्षकांनी लहान-लहान व्हीडीओ तयार करून प्रत्येक शाळा व विद्यार्थ्यांपर्यंत या व्हीडीओच्या माध्यमातुन उपक्रमाची माहिती पोहोचवावी. बालमनावर वृक्षारोपणाचे महत्व पटवून देणारे संस्कार करण्याचे पवित्र कार्य शिक्षण विभागाने यशस्वी करावे. फळबाग लागवड, शेततळे, दगडी बांध अशा विविध कामांचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांना दाखवावे. वरच्या इयत्तेतील विद्यार्थ्यांकडून प्रातिनिधीक स्वरूपात श्रमदान करून घेत वृक्षारोपणात सहभागी करून घ्यावे, असे आवाहनदेखील त्यांनी केले.या वेळी प्रातिनिधीक स्वरूपात शिक्षकांनी आपले मनोगत व्यक्त केले. बैठकीचे प्रास्ताविक उपशिक्षणाधिकारी डॉ.युनूस पठाण यांनी केले. उपजिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे तसेच शिक्षणाधिकारी कदम यांनी मनोगत व्यक्त केले.