कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथे गणवेश वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2019 11:47 IST2019-11-27T11:47:48+5:302019-11-27T11:47:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तोरखेडा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथील कुंभार गल्लीत   झालेल्या कार्यक्रमात गरजू विद्याथ्र्याना ...

Distribution of uniforms at Torakheda by Kumbhar Samaj Sangat | कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथे गणवेश वाटप

कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथे गणवेश वाटप

लोकमत न्यूज नेटवर्क
तोरखेडा : नंदुरबार जिल्हा कुंभार समाज संघटनेतर्फे तोरखेडा येथील कुंभार गल्लीत   झालेल्या कार्यक्रमात गरजू विद्याथ्र्याना गणवेश वाटप व नूतन पदाधिका:यांना नियुक्तीपत्राचे वाटप करण्यात आले.
प्रारंभी संत शिरोमणी गोरोबा काका यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जिल्हा सदस्य शांतीलाल सदाशिव प्रजापती तर प्रमुख अतिथी म्हणून जिल्हाध्यक्ष हृदयेश चव्हाण, दिलीप रामदास कुंभार, कांतीलाल प्रजापती, खगेंद्र मोहन कुंभार, भरत रमण कुंभार, रवींद्र प्रल्हाद कुंभार आदी उपस्थित होते. ज्या समाजामध्ये जन्म घेतला घेतला ती जात शेवटर्पयत जात नाही. आपल्या नावाच्या शेवटी आडनाव न लावता आपल्या जातीचेचे नाव लिहावे, असे आवाहन दिलीप कुंभार यांनी केले. समाज संघटनेशिवाय आपली प्रगती होणार नाही. तसेच समाजात असलेल्या अंधश्रद्धा समाजास घातक आहे, असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन दीपक साळुंके यांनी तर आभार खगेंद्र कुंभार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मनोहर प्रजापती, हिरालाल प्रजापती, दुल्हन प्रजापती, मयूर साळुंके, किशोर साळुंखे, गोविंद प्रजापती व युवक संघटनेच्या पदाधिका:यांनी परिश्रम घेतले.
 

Web Title: Distribution of uniforms at Torakheda by Kumbhar Samaj Sangat