तळोदा तालुक्यात मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:56+5:302021-05-20T04:32:56+5:30

तळोदा : राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मे महिन्यात मोफत धान्य देण्यात येत आहे. ही ...

Distribution of free foodgrains in Taloda taluka in the month of May | तळोदा तालुक्यात मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप सुरू

तळोदा तालुक्यात मे महिन्यात मोफत धान्याचे वाटप सुरू

तळोदा : राज्य शासनाच्या पुरवठा विभागाकडून अंत्योदय व प्राधान्य कुटुंबांना मे महिन्यात मोफत धान्य देण्यात येत आहे. ही कारवाई सध्या वेगात सुरू असून, तळोदा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानदारांना रेशन वितरित केल्यानंतर लाभार्थींना पावती देण्याची सक्ती करण्यात आली आहे. मालाची पावती मिळत असल्याने समस्या व वितरणातील काळाबाजार रोखला गेला आहे.

तळोदा तालुक्यात अंत्योदय योजनेचे साडेदहा हजार, तर ७२ हजार प्राधान्य कुटुंब लाभार्थीं आहेत. या सर्व लाभार्थींना धान्य वितरण करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग थांबविण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन लागू केले आहे. यामुळे शहराबरोबरच ग्रामीण भागातील गरीब कुटुंबापुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. यातून शासनाने पुन्हा मोफत रेशन देण्याची मागणी होत होती. मागणीनुसार शासनाने मे महिन्यात मोफत धान्य देण्याचा निर्णय घेतला होता. यात अंत्योदय कुटुंबाला ३५ किलो तांदूळ, गहू तर प्राधान्य कुटुंबातील प्रत्येक लाभार्थी पाच किलो धान्य देण्याचे निश्चित होते. यानुसार १ मेपासून तळोदा तालुक्यात स्वस्त धान्य दुकानांवर धान्याचे वितरण सुरू असून, लाभार्थींचे फोटो घेत पावती देऊन त्यांना रेशन देण्यात येत आहे. यामुळे रेशन वितरणात पारदर्शकता आली असून, पुरवठा विभागाचे अधिकारी व कर्मचारी सातत्याने तळोदा तालुक्यात भेटी देत असल्याचे सांगण्यात आले आहे.

Web Title: Distribution of free foodgrains in Taloda taluka in the month of May