मिशन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:21 IST2021-01-13T05:21:45+5:302021-01-13T05:21:45+5:30
शहरातील मिशन हायस्कूलमध्ये स्व. प्रेमदास कालू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छींद्र कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना ...

मिशन हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना साहित्य वाटप
शहरातील मिशन हायस्कूलमध्ये स्व. प्रेमदास कालू यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ हा उपक्रम राबविण्यात आला. माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छींद्र कदम यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप करण्यात आले. या वेळी कदम म्हणाले की, स्व. प्रेमदास कालू यांनी एस.ए. मिशन संस्थेच्या माध्यमातून गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या माध्यमातून घडवण्याचे कार्य केले आहे. त्यांच्या कन्या प्राचार्या नूतनवर्षा वळवी हा वसा पुढे नेत आहेत. कोरोनाच्या महामारीत विद्यार्थ्यांना आवश्यक वस्तू वाटप करण्याचा स्तुत्य उपक्रम त्यांनी राबवला आहे, असे सांगितले. सुनीता कुंवर यांनीही मनोगत व्यक्त केले. आर.के. वळवी, प्राचार्या नूतनवर्षा वळवी, पत्रकार धनराज माळी, भूषण गजभिये, उपमुख्याध्यापक व्ही.आर. पवार, पर्यवेक्षिका वंदना जांबिलसा, ए.आर. गर्गे, सी.पी. बोरसे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन किरण पाटील यांनी तर आभार प्रसाद दीक्षित यांनी मानले.