शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ला झालाच तर...! ५०,००० जवानांची विशेष 'ड्रोन फोर्स'; भारतीय सैन्याचा मोठा निर्णय
2
अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या सुरक्षेसाठी वापरले जाणारे 'ग्लॉक ४३X' पिस्तूल बंगालमध्ये कसे आले? जाणून घ्या या हायटेक पिस्तूलची वैशिष्ट्ये
3
Top Marathi News Live: विजय यांची बहुमत जुळवण्यासाठी धडपड, आणखी एका पक्षाला पाठवले पत्र
4
प. बंगालमध्ये खेला होबे! ममता बॅनर्जी यांच्या बैठकीतून पक्षाचे १० आमदार गायब; राजकीय चर्चांना उधाण
5
Jio चा छुपा रुस्तम प्लॅन!... दिसतच नाही, १४९ रुपयांत महिना जाणार, हे सर्च करा...
6
कधीकाळी सचिन तेंडुलकरसोबत टीम इंडियात केले पर्दापण; आज मानसिक आजाराशी लढतोय 'हा' खेळाडू
7
अनिल परब यांची राज्यभर गाजलेल्या दापोलीतील साई रिसॉर्ट प्रकरणातून निर्दोष मुक्तता
8
चंद्रनाथ रथ हत्येनंतर भाजपची मोठी घोषणा! पश्चिम बंगालमधून सगळ्या गुंडांना साफ करणार, सुवेंदु अधिकारी भडकले...  
9
अण्णा द्रमुकसोबत जाणार,  विरोधात बसणार, की...? स्टॅलिन यांनी केली मोठी घोषणा 
10
राज्य सरकारचा विभाग शक्तिपीठ महामार्गाची माहिती देत नाही- राजू शेट्टी यांचा आरोप
11
सुनेत्रा पवार यांच्या जागी छगन भुजबळ राज्यसभेवर जाणार? येवल्याची सूत्रे समीर भुजबळांकडे जाण्याची चर्चा
12
Manoj Tiwari : "सन्मानाने बाजूला व्हा, अन्यथा..."; ममता बॅनर्जींचा राजीनामा देण्यास नकार, मनोज तिवारींचं टीकास्त्र
13
Numerology: प्रगतीतील अडथळे दूर करण्यासाठी महत्त्वाच्या कामाला जाताना मूलांकानुसार 'हे' रंग टाळा!
14
"निजाम पॅलेसला ये, गप्पा मारू, चहा पिऊ अन् आनंद साजरा करू..."; चंद्रनाथ रथचं अखेरचं बोलणं ठरलं
15
धक्कादायक! १५ वर्षीय मुलीवर वडील अन् मामाकडून अत्याचार; नात्याला काळीमा फासणारी घटना उघड
16
सुवेंदु अधिकारींच्या पीएची हत्या प्रकरणात ३ संशयितांची चौकशी सुरू, मुख्य हल्लेखोर फरार
17
"आता पत्नी बाहेर गेली तर काळजी वाटत नाही", ३० वर्षे दिल्लीत राहिलेल्या माणसाचा व्हिडीओ व्हायरल
18
तामिळनाडूत रिसोर्ट पॉलिटिक्स! AIADMK च्या २८ आमदारांचा एक गट पुदुचेरीला पोहचला; TVK सोबत जाणार?
19
‘दिल्लीविरोधात लढ्याची घोषणा करा, १७ कोटी मुस्लिम साथ देतील’, या नेत्याने ममतांना दिली चिथावणी
20
राजीनामा न दिल्यास ममता बॅनर्जींवर गुन्हा दाखल होऊ शकतो?; घटनात्मक पेच, कायदेतज्ज्ञ सांगतात...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाबाहेरून आलेल्यांची तपासणी नसल्याने नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : चौथ्या लॉकडाऊनमध्ये केंद्र व राज्य शासनाने संचारबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे सर्व व्यवहार सुरळीत होऊन चाकरमानी ही मोठ्या शहरातून गावाकडे परतत आहेत. नियामानुसार जिल्हा बाहेरील व्यक्ती गावाकडे आली तर त्याला गावातील आरोग्य केंद्रात त्याची तपासणी करून १४ दिवस होमक्वॉरंटाईन व्हावे लागते. परंतु काही नागरिक जिल्हा बाहेरून आल्यानंतरही राजरोसपने बाजारात किंवा बाहेर फिरत आहेत.
या बेपर्वाहीमुळेच गेल्या सहा दिवसात ग्रामीण भागात कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसून येत आहे. त्यामुळे खेडेगावात व तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.
पहिल्या, दुसऱ्या, तिसºया व आता चौथ्या लॉकडाऊनमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून जिल्हाधिकारी, महसूल,पोलीस प्रशासन, आरोग्य कर्मचारी व ग्रामपंचायत प्रशासन जिल्ह्यात समन्वयाने व डोळ्यात तेल घालून काम करत आहे. नंदुरबार, शहादा व अक्कलकुवा या शहरी भागात आणि बामखेडा,आष्टे, नटावद सारख्या ग्रामीण भागात सुद्धा प्रशासन कोरोनामुक्त करण्यास यश मिळाले होते. परंतु नागरिकांच्या बेफिकरिमुळे त्या आनंदावर विरजन पडले. खेडेगावात कोरोनाने आता खरा प्रवेश करण्यास सुरूवात केली आहे. म्हणून बाहेरगावाहुन व जिल्हा बाहेरून आलेल्या व्यक्तींनी प्रशासनाच्या सूचनांचे तंतोतंत पालन करून आरोग्य तपासणी करून १४ दिवसांपर्यंत क्वॉरंटाईन होऊन सहकार्य करावे, असे आवाहन जिल्ह्यातील ग्रामपंचायत प्रशासन व पोलीस पाटील संघटनेकडून करण्यात येत आहे.