शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

बिल वसुलीच्या नावाखाली कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:58 IST

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद ...

शहादा तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती होती. मागील वर्षी कोरोना महामारीमुळे देशात लॉकडाऊन करण्यात आला. परिणामी बाजारपेठा बंद होऊन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना शेतमाल कवडीमोल भावाने विकावा लागला. कोरोना काळात शेतकऱ्यांचे जगणे मुश्कील झाले होते. यंदाही अतिवृष्टीमुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा फटका सहन करावा लागला. मुबलक पाणी उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे नियोजन करून नुकसानीची भर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कृषीपंपांची थकीत वीज बिल वसुली मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पाण्याअभावी पिके करपू लागली आहेत. गहू, हरभरा, उन्हाळी भुईमूग, भाजीपाला यांसह ऊस, पपई व केळीला पाण्याची सद्यस्थितीत नितांत गरज आहे. मात्र, वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने पिकांना पाणी देता येत नाही. पिकांना वेळेवर पाणी मिळाले नाही तर उत्पन्नात मोठी घट येऊन शेतकऱ्यांना पुन्हा आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. शेतकऱ्यांच्या हातात रब्बी हंगामातील उत्पन्न निघाल्यावरच पैसा येणार आहे. त्यामुळे ते सद्यस्थितीत वीज बिल भरू शकत नाहीत. त्यामुळे वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून ही मोहीम मागे घ्यावी व कृषीपंपांचा वीजपुरवठा पूर्ववत करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

कोरोनामुळे शेतकरी परेशान आहे. याचबरोबर दुष्काळात पाणी नाही, पाणी आहे तर वीजपुरवठा खंडित अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. वीज वितरण कंपनीकडून कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात येत असल्याने बागायतदार शेतकरी अक्षरशः वैतागून गेले आहेत. या गंभीर प्रकाराकडे जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

शहादा तालुक्यात वीज वितरण कंपनीचा अनागोंदी कारभार सुरू असून, किरकोळ दुरुस्तीसाठी दिवसभर वीजपुरवठा बंद केला जातो. अनेक ठिकाणचे ट्रान्स्फाॅर्मर नादुरुस्त आहेत. लोंबकळणाऱ्या वीज तारांमुळे वारंवार वीजपुरवठा खंडित होऊन रात्रभर ग्रामस्थांना अंधारात रहावे लागते. या बाबींमध्ये सुधारणा करण्याची गरज आहे.