मंडळांकडून विसजर्न करताना सुरक्षेबाबत बेपर्वाईची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 12:08 PM2019-09-10T12:08:39+5:302019-09-10T12:08:45+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क प्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र ...

Disregard for safety when discharged from circles | मंडळांकडून विसजर्न करताना सुरक्षेबाबत बेपर्वाईची स्थिती

मंडळांकडून विसजर्न करताना सुरक्षेबाबत बेपर्वाईची स्थिती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
प्रकाशा : जिल्ह्यातील बहुतांश मंडळांकडून प्रकाशा येथील तापी व गोमाई नदीत श्रींचे विसजर्न करण्यात येते. मात्र काही मंडळांकडून पुलाच्या कठडय़ांना खेटून वाहन लावण्यात येते व मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. ही स्थिती धोकेदायक ठरू शकते. म्हणून त्याबाबत उपाययोजना करण्याची गरज आहे.
गणेशोत्सवाच्या पाचव्या दिवसापासून अनंत चतुर्दशीर्पयत येथील तापी व गोमाई नदीकाठावर मंडळांकडून श्रींच्या मूर्तीचे विसजर्न करण्यात येते. काही मंडळांकडून मूर्तीचे विसजर्न करण्यासाठी ट्रॅक्टर ट्रॉली पुलाच्या कठडय़ाला खेटून लावतात व तेथून मूर्तीचे नदीपात्रात विसजर्न करतात. ही पद्धत धोकेदायक असून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आपत्ती व्यवस्थापनाच्या प्रशिक्षणार्थीकडून मंडळांच्या कार्यकत्र्याना सूचना देण्यात येतात. मात्र काही मंडळांचे कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसतात. त्यामुळे दुर्घटनेला आमंत्रण देण्यासारखे ठरू शकते. आधीच गोमाई नदीच्या पुलावरील कठडे चोरीला गेल्याने पूल मोकळा झाला आहे. त्यातच नदी दुथडी भरुन वाहत आहे. पाचव्या व सातव्या दिवशी येथे गणेश मूर्ती विसजर्नावेळी हवालदार गौतम बोराळे, वंतू गावीत, पंकज जिरेमाळी, शरीफ खाटीक, होमगार्ड व आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षणार्थी सीताराम ङिांगाभोई, अनिल ङिांगभोई,  विकी ङिांगाभोई, ईश्वर ङिांगाभोई, मंडळ अधिकारी मुकेश चव्हाण, तलाठी डी.एम. चौधरी हे पाचव्या आणि सातव्या दिवशी  घाटावर उपस्थित होते.
 

Web Title: Disregard for safety when discharged from circles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.