शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

धनाढ्यांचे अतिक्रमण न काढल्याने असंतोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2019 12:16 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : पालिकेने तीन दिवस राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत केवळ सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक धनाढ्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पालिकेने तीन दिवस राबविलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत केवळ सर्वसामान्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. अनेक धनाढ्य व्यावसायिकांनी नियमबाह्य बांधकाम करून शहरातील मुख्य रस्ते अडविले आहेत. पक्के बांधकाम करून अतिक्रमण केले आहे. अशा धनाढ्य व्यावसायिकांचे, खाजगी व्यापारी संकुलाच्या मालकांचे अतिक्रमण पालिका प्रशासनाने काढले नसल्याने नागरिकांमध्ये कमालीचा असंतोष वाढला आहे.गरीबांच्या अतिक्रमणावर हातोडा आणि धनिकांच्या अतिक्रमणाला संरक्षण असा प्रकार पालिका प्रशासनाने केले असल्याच्या प्रतिक्रिया शहरात उमटत आहे. पालिका प्रशासनाने कुठलाही दुजाभाव न करता सरसकट सर्वांचेच अतिक्रमण काढावे केवळ अतिक्रमण हटाव मोहिमेच्या नावाखाली वारंवार शहर उद्ध्वस्त करू नये, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहेजिल्हाधिकाऱ्यांच्या सुचनेनुसार वाहतुकीची समस्या सुटण्यासाठी अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम पालिकेतर्फे राबविण्यात आली. परिणामी शहरातील विविध रस्त्यांनी मोकळा श्वास घेतला. तथापि, लॉरीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीच्या वाहनांनी या रस्त्यावरच ठिय्या मांडल्याने वाहतुकीची समस्या ‘जैसे थे’ असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे पालिकेने राबविलेल्या अतिक्रमणाचा मूळ उद्देश असफल ठरत असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.शहरातील एका शाळेत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमानिमित्त जिल्हाधिकारी गेल्या आठवड्यात शहाद्यात आले होते. मुख्य रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या अतिक्रमणामुळे खुद्द जिल्हाधिकाऱ्यांनाच वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करावे लागले होते. त्यामुळे जिल्हाधिकाºयांनी पालिका प्रशासनाला धारेवर धरत शहरातील रहदारीस अडथळा ठरणाºया व्यावसायिक अतिक्रमणासोबत विविध भागातील कच्चे व पक्के अतिक्रमण काढण्याबाबत कारवाई करण्याची सूचना केली होती. पालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने तात्काळ विविध भागात रिक्षा फिरवून ध्वनीक्षेपकाद्वारे उद्घोषणा करुन अतिक्रमण काढून घेण्याबाबत सूचित केले होते. अतिक्रमणधारकांनी स्वत: अतिक्रमण न काढल्यास टपरी, शेड जप्त करुन खर्च वसूल करण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी स्वत: टपरी-शेड काढून घेतल्याने दोंडाईचा रोड, डोंगरगावरोड, मेनरोड, जना मोहिदा रोड, पंचायत समिती चौक, बसस्टॅण्ड परिसर, खेतियारोड चौफुली, पाण्याची टाकी, गॅसगोडाऊन परिसर येथील रस्ते मोकळे झाले होते. जुना प्रकाशा रोड, प्रेस मारुती मैदान, टाऊन हॉल परिसरातील कच्चे व पक्के अतिक्रमण तोडण्यासाठी पालिका पथकाने बुलडोझरचा वापर केला. भाजीमंडईसह शहराच्या विविध भागातील रस्ते यामुळे मोकळे झाले.मात्र गेल्या दोन दिवसांपासून या रस्त्यांवर पुनश्च लॉरीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने लावण्यात येत असल्याने ज्या उद्देशाने मोहीम राबविण्यात आली. तो उद्देश फसल्याचे दिसून येत आहे. लॉरीधारकांनी बसस्टॅण्ड परिसर, भाजीमंडई, महात्मा गांधी पुतळा चौक, स्टेट बँक चौक, मेनरोड आदी ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशाप्रकारे लॉरी लावून व्यवसाय सुरु केला आहे. अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने जुन्या तहसील कचेरी, डोंगरगाव रोड, बसस्थानक परिसर, टॅक्सी स्टॅण्ड आदी ठिकाणी वाहतूक पोलिसांच्या नाकावर टिच्चून उभी केली जात असल्याने रहदारीस अडथळ्यासह वाहतूक कोंडीची समस्या ‘जैसे थे’ झाल्याचे दिसून येत आहे.