शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

मतीमंद बालिकांना आपल्याच लेकीसारखे सांभाळणारे अपंग पालक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 11:57 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कुटूंबात मतीमंद मुुलगी जन्मास आल्यावर त्यांचा सांभाळ करणे अनेकांना जिकरीचे जाते. ...

मनोज शेलार ।लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कुटूंबात मतीमंद मुुलगी जन्मास आल्यावर त्यांचा सांभाळ करणे अनेकांना जिकरीचे जाते. परंतु स्वत: पायाने अपंग असूनही त्या व्यंगाची पर्वा न करता आपल्या अर्धांगीणीच्या मदतीने ३० पेक्षा अधीक मतीमंद मुलींची सेवा करणारे नंदुरबार येथील भास्कर कुवर यांची सेवा अनेकांना प्रेरीत करणारी आहे.नंदुरबारातील गुरुकुल नगर भागात राहणारे भास्कर कुवर हे स्वत: मतीमंद विद्यलायात शिक्षक आहे. तेथील विद्यार्थ्यांचे दु:ख पाहून त्यांनी आपणही अशा मुलांची विशेषत: मुलींची सेवा करण्याचे ठरविले. ही इच्छा त्यांनी आपली पत्नी भारतीबाई यांना बोलून दाखविली. भारतीबाई यांनीही मोठ्या खुशीने त्याला तयारी दाखविली. त्यासाठी काकुमाय बहुउद्देशीय संस्था स्थापन केली. स्वत:ची दोन मुले आणि ही २५ ते ३० मतीमंद मुली असा संसार त्यांना गेल्या १० वर्षांपासून सुरू आहे. गुरुकुलनगरात त्यांनी एका इमारतीत हा संसार सुरू केला.मतीमंद मुलींचे वर्तन समस्या कमी करून त्यांना त्यांच्या कुटूंबात व समाज प्रवाहात हक्काचे व सुरक्षेचे स्थान मिळवून देण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. ४ ते १२ वर्ष वयोगटातील मतीमंद मुलींचा ते सांभाळ करतात. नंदुरबार जिल्ह्यासह धुळे व जळगाव जिल्ह्यातील मुली देखील त्यांच्याकडे राहतात. आवश्यक ते सर्व शिक्षण ते त्यांना देत असतात. त्यासाठी काही सेवकांची देखील त्यांनी नियुक्ती करून घेतली आहे. याशिवाय मानसोपचार तज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भौतिकोपचारतज्ज्ञ यांना ते नियमित बोलावून या मुलींची मानसिकता अधिकाधिक सुधरविण्यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. येथे येणारे समुपदेशक विविध भागातील असतात.गेल्या १० वर्षात शासनाचे कुठलेही अनुदान त्यांना मिळालेले नाही. स्वत:चा खर्च, सामाजिक संस्थांची मदत, दानशूर व्यक्तींचे सहकार्य या बळावरच त्यांनी आपला हा संसार चालविला आहे. वाढत्या खर्चात त्यांना मोठी कसरत करावी लागते.अगदी स्वत:च्या दोन मुलांसारखे प्रेम ते या मुलांवर करतात. घरापासून लांब राहणारे व आपल्या वर्तनात रममान राहणाऱ्या या लेकरांना बापाची माया देणारे भास्कर कुवर या मुलींना त्यांच्या सख्या बापाचीही आठवण येऊ देत नाही. सेवा परमो धर्म या उक्तीप्रमाणे त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे. जोपर्यंत इच्छाशक्ती आहे तोपर्यंत सुरू राहणार असल्याचे भास्कर कुवर सांगतात.

घरात मतीमंद/गतीमंद बालक जन्माला आल्यावर आभाळ कोसळल्यासारखी स्थिती त्या कुटूंबाची होते. त्यामुळे अशा बालिकांची सेवा करण्याची इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून होती. त्यासाठी सुरुवातील अगदी १० बाय १० च्या घरात ही सेवा सुरू केली. त्यानंतर मोठे घर घेऊन तेथे ३० बालिकांची सेवा करीत आहोत.-भास्कर कुवर, नंदुरबार.

अतीशय गरीब परिस्थितीतून आम्ही गेलो आहोत. त्यामुळे गरीबांची सेवा करण्याची इच्छा होती. पतीने मतीमंद बालिकांची सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली. आपण मोठ्या खुशीने ती मान्य केली. दोन मुलींपासून आज आम्ही २५ ते ३० मुलींना लेकीसारखी माया देत आहोत. दाते त्यासाठी पुढे येतात.-भारती कुवर, नंदुरबार.

रक्ताचे नाते असलेल्या मुलांचा सांभाळ प्रत्येक जण आपापल्या परीने करीत असतो; पण अनेक जण अपंग, मतीमंद यांना देखील आधार देत समाजसेवेच्या माध्यमातून त्यांना घडवत असतात.या मुलांना आपले समजून अख्खे जीवन त्यांच्याचसाठी घालविणारा ‘बाप माणूस’देखील आपल्यांमध्येच असतो. अशा बाप माणसाला ‘फादर्स डे’निमित्त ‘लोकमत’चा सलाम!