शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पाच पोलीस ठाण्यांमधील दूरध्वनींची ‘खणखण’ चार महिन्यापासून झाली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2019 12:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये संपर्कासाठी महत्त्वपूर्ण असलेला दूरध्वनी चार महिन्यांपासून बंद आह़े पाचपैकी चार ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील पाच पोलीस ठाण्यांमध्ये संपर्कासाठी महत्त्वपूर्ण असलेला दूरध्वनी चार महिन्यांपासून बंद आह़े पाचपैकी चार पोलीस ठाणे हे सपाटीवरील असून एक पोलीस ठाणे हे दुर्गम भागातील आह़े पोलीस ठाण्याचा टेलिफोनच बंद असल्याने गुन्हे व अपघातांची माहिती देण्यासाठी नागरिक थेट पोलीस ठाण्यात जात आहेत़   जिल्ह्यात 12 पोलीस ठाण्यांची निर्मिती करण्यात आली आह़े याठिकाणी नागरिकांना संपर्क करता यावा, यासाठी टेलिफोन देण्यात आले आहेत़ वर्षानुवर्षे सुरु असलेले हे टेलिफोन गेल्या वर्षभरापासून सातत्याने बंद पडत असल्याचा प्रकार सुरु आह़े सातपुडय़ाच्या अतीदुर्गम भागात असलेल्या मोलगी पोलीस ठाण्यात जानेवारी 2019 पासून फोन बंद आह़े दूरसंचारची सेवाच नसल्याने येथे इतर कामकाज जुन्याच पद्धतीने सुरु आह़े अती दुर्गम भागात ही स्थिती असतानाच शहादा तालुक्यातील म्हसावद, सारंगखेडा, नवापुर, अक्कलकुवा या तीन ठिकाणचे दूरध्वनी गेल्या चार महिन्यात वेळोवेळी बंद पडत आहेत़ अतीसंवेदनशील भागाचा समावेश या पोलीस ठाण्यांच्या हद्दीत असतानाही तेथील दूरध्वनी बंद असल्याने कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास नागरिकांनी संपर्क करावा तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आह़े शहादा पोलीस ठाण्याचे काही महिन्यांपूर्वी शहराबाहेर दोंडाईचा रोडवर स्थलांतर झाल्याने याठिकाणचा दूरध्वनी दोन महिने बंद होता़ येथील पोलीस अधिका:यांनी पाठपुरावा केल्यानंतर गेल्या आठवडय़ापासून येथील दूरध्वनी सेवा पूर्ववत झाली आह़े  हीच स्थिती सध्या नंदुरबार शहर पोलीस ठाण्याची असून येथे संपर्क केल्यास केवळ ‘रींग’ वाजत आह़े त्याला प्रतिसादच मिळत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आह़े पोलीस दलाकडून जिल्ह्यातील पोलीस ठाणे ऑनलाईन करण्याची तयारी असताना टेलिफोनसारखी अतीमहत्त्वाची सेवा बंद असताना पोलीस ठाणे डिजीटल होणार कसे असा, प्रश्न आह़े विशेष बाब म्हणजे पोलीस दल प्रशासनाकडून दूरसंचार विभागाकडे बिलांचा भरणा करुनही ही स्थिती निर्माण झाली आह़े