शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
3
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
4
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
5
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
6
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
7
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
8
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
9
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
10
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
11
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
12
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
13
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
14
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
15
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
16
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
17
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
18
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
19
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
20
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
Daily Top 2Weekly Top 5

रात्री होणाऱ्या लिलावामुळे अडचण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:08 IST

नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री लिलाव करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त ...

नंदुरबार : कृषी उत्पन्न बाजार समितीत रात्री लिलाव करण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी त्रस्त झाले असून रात्री वाहने मिळत नसल्याने त्यांना अडचणी येत आहेत. याकडे बाजार समिती प्रशासनाने लक्ष देत कारवाई करण्याची मागणी होत आहे. तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांना पोहोचत येत नसल्याचे सांगण्यात येत आहे.

दुर्गम भागात हिंस्र प्राण्यांमुळे चिंता

धडगाव : तालुक्यातील वडफळ्या येथे शेळ्या मयत झाल्याच्या घटनेने पशुपालकांमध्ये चिंता वाढली आहे. जंगलातील झरे आटत असल्याने जनावरे गाव-पाड्यांच्या जवळ येत आहेत. यातून पाळीव पशुंवर हल्ले होण्याचे प्रकार वाढले असल्याने चिंता व्यक्त होत आहे.

उपसा सिंचन योजनेला गती द्यावी

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी संजीवनी ठरणाऱ्या उपसा सिंचन योजनेला गती देण्याची मागणी करण्यात आली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून ही प्रक्रिया रखडली आहे. यंदाच्या वर्षात ही योजना व्हावी, अशी अपेक्षा आहे. प्रशासनाने कामाला गती देण्याची सूचना करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. योजनेचे काम काहीअंशीच शिल्लक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

पोलीस गस्तीची गरज

नंदुरबार : शहरातील होळ तर्फे हवेली शिवारातील विविध वसाहतींमध्ये पोलीस गस्त वाढवण्याची रहिवाशांची मागणी आहे. या भागात भुरटे चोर रात्री भटकत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. चोरीच्या घटनाही वाढीस लागल्या असल्याने नागरिक चिंतेत आहेत.

सुशोभिकरण सुरू

नंदुरबार : शहरातील विविध भागात सध्या सुशोभिकरण करण्यात येत आहे. या अंतर्गत शहरातील दुभाजकांवर वारली पेंटिंग करण्याचे काम सुरू आहे. या कामामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शहरातील विविध चाैकांमध्ये साफसफाईही करण्यात आली आहे.

गाईने उडवली नागरिकांची झोप

नंदुरबार : शहरालगतच्या होळ तर्फे हवेली शिवारातील गुरुकुलनगर दोन परिसरात एका गायीमुळे नागरिकांची झोप उडाली आहे. गेल्या आठ ते दहा दिवसांपासून लाल रंगाची गाय वसाहतीतील वाहनधारक किंवा पायी चालणाऱ्यांवर धावून जात आहे. यातून एक दोघांना किरकोळ जखमाही झाल्या आहेत. गायीचा बछडा काही दिवसांपूर्वी या परिसरात मयत झाला होता. तेव्हापासून गाय दिसेल त्याच्यावर अगांवर धावून जात असल्याचे सांगण्यात येत आहे.

पथदिवे बंदच

नंदुरबार : शहरातील गुरव चाैक ते बायपास रोड दरम्यान तयार केलेल्या मार्गावरचे पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत. याबाबत अनेकवेळा सांगूनही पथदिवे सुरू होत नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. या मार्गावर रात्री उशिरापर्यंत नागरिक पायी फिरण्यासाठी जातात.

बॅटऱ्या खराब

धडगाव : दुर्गम भागात दूरसंचार विभागाने लावलेल्या टाॅवरच्या बॅटऱ्या खराब झाल्या असल्याने वेळावेळी टाॅवर बंद होऊन सेवा ठप्प होत आहे. याबाबत नागरिकांनी दूरसंचार विभागाला माहिती देऊनही योग्य ती कारवाई करण्यात आलेली नाही. दुर्गम भागात दररोज सेवेचा बोजवारा उडत आहे.

रुग्णालयांमध्ये सुविधा द्याव्यात

नंदुरबार : जिल्ह्यातील ग्रामीण रुग्णालयात विविध सुविधा देण्याची गरज आहे. गेल्या काही दिवसात रुग्णालयांमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढत असताना, चांगल्या दर्जाचे बेड तसेच विविध सुविधा मिळत नसल्याने त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.