शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

धडगाव तालुक्यात महिलेला ‘डाकीण’ ठरवून जीवे ठार मारण्याची दिली धमकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘तू आजवर सात माणसे खाऊन टाकली माझ्याही मुलीला जादूटोणा करुन खात आहेस’ असा आरोप ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : ‘तू आजवर सात माणसे खाऊन टाकली माझ्याही मुलीला जादूटोणा करुन खात आहेस’ असा आरोप करत महिलेला डाकीण ठरवून छळ केल्याची घटना धडगाव तालुक्यात उघडकीस आली़ चिखलीचा नेवाड्यापाडा येथे घडलेल्या घटनेनंतर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे़रायदीबाई पोढ्या पावरा (५५) असे पिडित महिलेचे नाव असून त्या चिखली येथील रहिवासी आहेत़ १५ जानेवारी रोजी रायदीबाई ह्या चिखली गावातील अनाज्या पाडवी यांच्या शेतात काम करत असताना त्याठिकाणी बाज्या ठोबा पावरा, पिंटीबाई बाज्या पावरा, तरसिंग ठोबा पावरा आणि प्रताप ठोबा पावरा सर्व रा़ चिखली यांनी जाऊन वाद घालण्यास सुरुवात केली होती़ चौघांनी रायदीबाई यांनी बाज्या आणि पिंटीबाई यांची मुलगी ईमला हिला हानी पोहोचवत असल्याचा दावा करत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली़ दरम्यान चौघांनी रायदीबाई यांना जीवे ठार मारण्याची धमकी देत डाकीण असल्याचा आरोप केला होता़ घटनेनंतर घाबरलेल्या रायदीबाई यांनी गावपंचांकडे धाव घेत तक्रार मांडली होती़ पंचांनी दोन्ही कुटूंबांना समज दिली होती़ परंतू तिथे समझोता न झाल्याने अखेर रायदीबाई यांनी कुटूंबासह धडगाव पोलीस ठाण्यात धाव घेत बाज्या पावरा, पिंटीबाई , तरसिंग आणि प्रताप पावरा यांच्याविरोधात फिर्याद दिली़ चौघांविरोधात सोमवारी सायंकाळी महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष अघोरी विद्याकृत्यांना प्रतिबंध व निर्मुलन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ तपास पोेलीस नाईक साळवे करत आहेत़दरम्यान तालुक्यात गेल्या वर्षभरात या प्रकारचे चार गुन्हे दाखल असून नवीन वर्षातील पहिल्याच गुन्ह्यामुळे तालुका हादरला आहे़