शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! मध्यपूर्वेत इराणनं अमेरिकेची कंबर मोडली; ८ देशांतील लष्करी तळ उद्ध्वस्त, रडारपासून विमानांपर्यंत सर्वकाही नष्ट!
2
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
3
शत्रूचा कर्दनकाळ! भारताचे 'अग्नी-६' अमेरिकेपर्यंत पोहोचणार? जगातील कोण कोणते देश निशाण्यावर येणार? ताकद पाहून चक्रावून जाल
4
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
5
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
6
भुसावळातील भीषण आग; सहा घरे जळून खाक; चार बकऱ्यांचा होरपळून मृत्यू
7
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
8
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
9
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
10
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
11
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
12
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
13
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
14
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
15
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
16
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
17
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
18
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
19
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
20
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
Daily Top 2Weekly Top 5

शहरात कोंडवाडा तयार असूनही जनावरे मोकाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 04:20 IST

शहरातील अनेक भागात अरुंद रस्ते असल्याने वारवांर वाहतुकीचा खोंळबा निर्माण होत असल्याने या भागात मोकाट गुरे व कुत्र्यांची समस्या ...

शहरातील अनेक भागात अरुंद रस्ते असल्याने वारवांर वाहतुकीचा खोंळबा निर्माण होत असल्याने या भागात मोकाट गुरे व कुत्र्यांची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे अनेकवेळा अपघात देखील झाले आहेत. पालिका प्रशासनाने मोकाट गुरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून करण्यात येत आहे. शहरातील उघड्यावरील कचऱ्यामुळे मोकाट जनावरांना खाद्य मिळत असल्याने साफसफाई कामात कुचराई केल्याबद्दल पालिकेने सफाई ठेकेदारांना दंडही ठोठावला आहे. गेल्या महिन्यापासून सेवा फाउंडेशन या सफाई ठेकेदार संस्थेने मोकाट गुरे पकडण्याची मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासाठी पालिकेने त्यांना कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कोंडवाडा उपलब्ध करून दिला आहे. या मोहिमेला सुरुवात होऊन महिना झाला, मात्र मोकाट गुरामुळे वाहतुकीचा खोळंबा निर्माण होत आहे.

कोंडवाड्यात सुरुवातीला गुरांची रवानगी केल्याने बऱ्यापैकी रस्त्याची मोकळीक झाली होती. पालिकातर्फे गुरे मालकांना गुरे बांधून ठेवावी, अन्यथा बेवारस गुरे जप्त करण्यात येतील व गुरांना सोडविण्यासाठी मालकास प्रतिदिन २०० रुपये दंड भरावा लागणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले असूनही शहरातील अहिल्याबाई विहीर चौक, क्रांती स्मारक चौक, गणपती मंदिर, हाटदरवाजा, अंधारे स्टॉप, मंगळबाजार या भागात मोकाट गुुुुरे ठाण मांडून बसल्याचे चित्र दिसून येत आहे. मोकाट गुरांमुळे रहदारीला १५ ते २० मिनिटे पर्यत अडथळा निर्माण होत असून मोकाट गुुुुरे रस्त्यावर फिरत असल्याने वाहने चालवताना किरकोळ अपघात घडण्याचे प्रमाण वाढले आहे. नगरपालिका प्रशासनाने मोकाट गुरे ताब्यात घेऊन मालकांना गुरे गोठंयात बाधंण्यासाठी सक्ती करावी, व कायदेशीर कारवाई करावी, असे मत वाहनधारकाकडून व्यक्त होत आहे.

शहरातील विविध चौकात मोकाट गुरांचा वाढला त्रास

शहरातील भाजीपाला मार्केट,बसस्थानक परिसर,नेहरू चौक,जुनी पालिका रोड, अहिल्याबाई विहीर चौक, क्रांती स्मारक चौक, गणपती मंदिर, हाटदरवाजा,अंधारे स्टॉप, मंगळबाजार या रस्त्यावर मोकाट गुरे ठाण मांडून बसलेली असतात. त्यामुळे वाहतुकीला वारंवार अडथळा निर्माण होत असल्याने वाहनांचा खोळंबा निर्माण होत आहे.

शहरातील मोकाट गुरांची समस्या गेल्या १५ वर्षांपासून सुरू असून पालिकाने आतापर्यंत या समस्येवर मार्ग काढला नसून मोकाट गुरांमुळे वाहनचालकांना अपघात होऊन अवयव निकामी होऊन त्रास सहन करावे लागत आहे. यावर कायम स्वरूपाचा मार्ग काढणे आवश्यक आहे.

-अमोल राजपूत वाहनधारक,नंदुरबार

मोकाट जनावरामुळे रस्त्याने पायी चालनेही मुश्कील झाले असून कधीही अंगावर मोकाट जनावरे व कुत्रे येथील याची मनात नियमित भीती असते, पालिका प्रशासनाने याबाबत ठोस भूमिका घेऊन मोकाट जनावराची योग्य ठिकाणी रवानगी करावी.

- विक्की सूर्यवंशी व्यावसायिक,नंदुरबार