शहरं
Join us  
Trending Stories
1
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
2
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
3
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
4
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
5
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
6
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
7
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
8
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
9
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
10
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
11
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
12
फास्टॅग फसवणुकीचा नवा प्रकार! NHAI कडून महत्त्वाची सूचना जारी; एक चूक आणि होईल मोठं नुकसान
13
भयंकर...! आदल्या रात्री मित्राच्या बायकोवरही बलात्कार करून आलेला; IRS अधिकाऱ्याच्या मुलीच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा
14
“२०२७ यूपी विधानसभा निवडणुकीसाठी योगी आदित्यनाथच भाजपाचा चेहरा”; नितीन नवीन यांचे मोठे विधान
15
“उद्धव ठाकरे यांनीच विधान परिषदेची निवडणूक लढावी”; सुप्रिया सुळे यांनी केली आग्रहाची विनंती
16
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
17
CSK ची नवी चाल! मुंबईकर आयुष म्हात्रेच्या जागी MI च्या माजी खेळाडूला मिळाली वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
उल्हासनगरात महापौरांचा पती भाजपच्या टार्गेटवर? आयुक्तांकडे महापौर पतीला एन्ट्री दिल्यावरून भाजपा नगरसेवकांचा धिंगाणा 
19
उन्हाळ्यात आवडीने कलिंगड खाताय... जाणून घ्या, किडनीवर ‘कसा’ होतो परिणाम?
20
नवरीचा अजब निर्णय! लग्नाला नकार, सासरी जाण्याऐवजी मैत्रिणीसोबत जाण्यावर ठाम; पोलीसही चक्रावले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा रुग्णालय इमारतींमध्ये इलेक्ट्रीक ॲाडीटबाबत उदासिनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्हा रुग्णालयाची इमारत नवी असल्यामुळे इलेक्ट्रीक फिटिंगची अवस्था ब-यापैकी आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक ॲाडीट करण्याची ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्हा रुग्णालयाची इमारत नवी असल्यामुळे इलेक्ट्रीक फिटिंगची अवस्था ब-यापैकी आहे. त्यामुळे इलेक्ट्रीक ॲाडीट करण्याची गरज भासली नसल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे. असे असले तरी दर वर्षी इलेक्ट्रीक ऑडीट करणे बंधनकारक आहे. रुग्णालयातील काही कक्षांमध्ये वायरी व बटन बॅाक्स उघडे असल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे अग्नीरोधक उपकरण देखील मोजक्याच ठिकाणी असल्याचे चित्र आहे. भंडारा येथे जिल्हा रुग्णालयातील आगीत १० अर्भकांचा मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर खळबळ उडाली आहे. त्यामुळे सर्वच जिल्हा रुग्णालयांचे फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट करण्याच्या सुचना राज्य शासनाने दिल्या आहेत. नंदुरबार जिल्हा रुग्णालयात देखील त्यासंदर्भात तयारी सुरू करण्यात आली आहे. प्रतिनिधीनीने केेलेल्या पहाणीत मात्र अनेक ठिकाणी त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामुळे उपाययोजना करणे गरजेचे आहे. 

पाहणीत काय आढळले ?निर्जंतुकीकरण विभागातील इलेक्ट्रीक उपकरणे उघडी आहेत. वायरी लोंबकळल्या आहेत. जुन्या इमारतीत अनेक ठिकाणी अशी समस्या आहे. काही वॅार्डात बटन बॅाक्स देखील खराब झाले असून ते उघडे आहेत. याउलट नवीन इमारतीमंधील वायरींग ही सुस्थित आहे. फ्यूजपेट्या आणि बटन बॅाक्स भिंतीच्या आतमध्ये लावण्यात आलेले आहेत. 

‘कालाकल्प’चा दोन वेळा पुरस्कारनंदुरबार जिल्हा रुग्णालयाला सलग दोन वर्ष कायाकल्प पुरस्कार मिळाला आहे. त्यासाठी असलेल्या अटीत अग्नीरोधक यंत्र, इलेक्ट्रीक सुरक्षीतता यालाही गुण असतात. जिल्हा रुग्णालयाने आतापर्यंत फायर व इलेक्ट्रीक ॲाडीट केलेले नाही हे मात्र वास्तव आहे.

२१ जानेवारीपर्यंत ऑडीटजिल्हा रुग्णालयाच्या सर्व इमारती या नव्या आहेत. तेथे ईलेक्ट्रीक फिटींग देखील चांगल्या स्थितीत आहे. कायाकल्प पुरस्काराच्या अटीअंतर्गत त्याचा दरवर्षी आढावा घेतला जातो. आता २१ जानेवारीपर्यंत ॲाडीट देखील करण्यात येणार आहे. -डॅा.के.डी.सातपुते,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकीत्सक.

दुर्गम भागातून येथे उपचारासाठी आलो आहे. सुविधा चांगल्या असल्या तरी त्यात सातत्य हवे. स्वच्छता वेळेवर व्हावी, नादुरूस्त पंखे दुरूस्त करावे. सद्या हिवाळा असल्यामुळे पंख्याची गरज नसली तरी डास व मच्छरांपासून बचावासाठी पंखा लावावा लागतो.  -एक महिला रुग्ण, धडगाव तालुका.

जिल्हा रुग्णालयाच्या इमारती नव्या असल्यामुळे सुविधा ब-या आहेत. परंतु स्वच्छतागृहे फारच खराब आहेत. पिण्याचे स्वच्छ पाणी हवे. नियमित पंखे सुरू राहू द्यावे. डास व मच्छरांचा प्रादुर्भाव असल्यामुळे त्रास होतो. त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे. - तुकाराम पावरा, रुग्ण.