वाण्याविहीर येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST2021-04-25T04:30:23+5:302021-04-25T04:30:23+5:30

वाण्याविहीर येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण होत आहेत. ...

Demand for start of separate power substation at Vanyavihir | वाण्याविहीर येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करण्याची मागणी

वाण्याविहीर येथे स्वतंत्र वीज उपकेंद्र सुरू करण्याची मागणी

वाण्याविहीर येथे गेल्या अनेक दिवसांपासून वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात नागरिक हैराण होत आहेत. सातत्याने निर्माण होणाऱ्या वीज समस्येवर मात करण्यासाठी कंपनीने वाण्याविहीर येथे स्वतंत्र वीज केंद्र उभारण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे. तसेच अक्कलकुवा येथेही १३२ केव्हीचे वीज केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे. अक्कलकुवा तालुक्यातील ही वीजपुरवठा खंडित होण्याची नित्याचीच बाब झाली आहे. मात्रए प्रशासनाचे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेकजण घरीच आहेत. यात कोरोना लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक आहे. त्यांना आराम करण्यासाठी वीज पुरवठ्याची गरज आहे. परंतु वीजपुरवठा वेळेवर होत नसल्याने समस्या वाढत आहेत. वीज वितरण कंपनी व लोकप्रतिनिधी यांनी या गंभीर समस्येची दखल घेऊन वाण्याविहीर येथे स्वतंत्र वीज केंद्र व अक्कलकुवा येथे १३२ केव्ही उपकेंद्र सुरू करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Demand for start of separate power substation at Vanyavihir